साउथ फिल्म इंडस्ट्रीचा सुपरस्टार सूर्या आणि अभिनेत्री पूजा हेगडे यांच्या आगामी रेट्रो' या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे. चित्रपटाच्या निर्मात्यांनी सोशल मीडियावर चित्रपटाचे शीर्षक 'रेट्रो' जाहीर केले आणि प्रेक्षकांसोबत टीझर शेअर केला. सोशल मीडियावर सक्रिय असलेली अभिनेत्री पूजा हेगडे मोस्ट अवेटेड चित्रपटाशी संबंधित प्रत्येक अपडेट शेअर करत असते. अभिनेत्रीने चित्रपटाचा टीझर इन्स्टाग्रामवर शेअर करून चाहत्यांना माहिती दिली आहे.
पूजा हेगडेने इंस्टाग्रामवर दोन मिनिटांचा टीझर शेअर केला आणि कॅप्शनमध्ये लिहिले की, "या पात्रात माझ्या हृदयाचा एक तुकडा आहे." 'रेट्रो', भावनांच्या चढ-उतारांनी भरलेली प्रेमकथा, 'सूर्या 44'चे टायटल टीझर 'रेट्रो' भेटीला आलं आहे." दोन मिनिटे आणि पाच सेकंदांच्या या टीझरमध्ये बनारसमधील घाटाच्या काठावर सूर्या आणि पूजा हेगडे यांची पात्रे बसलेली दाखवण्यात आली आहेत. पूजा फिकट गुलाबी रंगाच्या साडीत तर सूर्या काळ्या रंगाच्या कुर्त्यात दिसत आहे. पूजा हातावर पवित्र धागा बांधते. सूर्या तिच्या डोळ्यात पाहतो आणि तमिळमध्ये म्हणतो, "मी माझ्या रागावर नियंत्रण ठेवेन. मी माझ्या वडिलांसोबत काम करणे सोडून देईन. हिंसाचार, गुंडगिरी, लाठीमार—मी आता सर्व काही सोडून देईन. मी हसण्याचा आणि आनंदी राहण्याचा प्रयत्न करेन. मी प्रयत्न करेन. माझ्या आयुष्याचा उद्देश निव्वळ प्रेम आहे. आता मला सांग, लग्न करायचं का?
वर्कफ्रंटवर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, 'किसी का भाई किसी की जान' फेम पूजा हेगडेकडे अनेक खास प्रोजेक्ट आहेत. पूजाकडे 'थलपथी ६९' आणि 'है जवानी तो इश्क होना है' यासह थलपथी विजयसह इतर अनेक इंटरेस्टिंग प्रकल्प आहेत. अभिनेत्रीने अलीकडेच चेन्नईमध्ये 'थलापथी 69' चे शूटिंग सुरू झाल्याची माहिती देणारी एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली होती. 'थलापथी ६९' मध्ये हेगडे पहिल्यांदाच विजयसोबत ऑनस्क्रीन दिसणार आहेत. साउथचा सुपरस्टार सूर्याच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर तो शेवटचा 'कंगुवा'मध्ये दिसला होता. बॉबी देओल या चित्रपटात अभिनेत्यासोबत खलनायकाच्या भूमिकेत होता.