सेलिब्रिटी कपलने गुडन्यूज दिली आहेत. सिनेसृष्टीतील हे लोकप्रिय जोडपं पुन्हा आईबाबा होणार आहेत. त्यांच्या घरात लवकरच नव्या पाहुण्याचं आगमन होणार आहे. साऊथ कपल अॅटली कुमार आणि प्रिया मोहन यांनी ही गुडन्यूज चाहत्यांसोबत शेअर केली आहे. अॅटली आणि प्रिया यांना नव्या बाळाची चाहुल लागली आहे. त्यामुळे ते दोघेही आनंदी आहेत. कुटुंबात नव्या पाहुण्याचं स्वागत करण्यासाठी ते दोघेही आतुर आहेत.
अॅटली कुमारची पत्नी प्रिया दुसऱ्यांदा गरोदर आहे. काही फोटो शेअर करत त्यांनी ही गोड बातमी चाहत्यांना दिली आहे. फोटोंमध्ये प्रिया तिचा बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसत आहे. प्रिया आणि अॅटलीसह त्यांच्या मुलानेदेखील फोटोसाठी खास पोझ दिल्या आहेत. या फोटोंमध्ये प्रिया, अॅटली आणि त्यांच्या मुलासोबत घरातील पेट्सही दिसत आहेत. "आमच्या घरात आणखी एक नवा पाहुणा येणार आहे. हो आम्ही प्रेग्नंट आहोत. तुमचं प्रेम, आशीर्वाद आणि प्रार्थनांची आम्हाला गरज आहे", असं कॅप्शन या पोस्टला देण्यात आलं आहे. या पोस्टवर कमेंट करत चाहते आणि सेलिब्रिटींनीही त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
अॅटली कुमार हा साऊथमधील लोकप्रिय दिग्दर्शक आहे. थेरी, आ २, बिगिल असे सिनेमे त्याने दिग्दर्शित केले आहे. साऊथसोबतच जवान, बेबी जॉन या बॉलिवूड सिनेमांचं दिग्दर्शनही अॅटलीने केलं आहे. २०१४ मध्ये अॅटली आणि प्रियाने लग्न करत संसार थाटला. २०२३ मध्ये प्रियाने त्यांच्या पहिल्या बाळाला जन्म दिला होता. आता ते दुसऱ्या बाळाच्या स्वागताची तयारी करत आहेत.
Web Summary : Director Atlee Kumar and Priya Mohan happily announced they are expecting their second child. The couple shared photos flaunting Priya's baby bump, with their first child and pets. Celebrities and fans showered them with congratulatory messages. They married in 2014 and welcomed their first baby in 2023.
Web Summary : निर्देशक एटली कुमार और प्रिया मोहन ने खुशी से घोषणा की कि वे अपने दूसरे बच्चे की उम्मीद कर रहे हैं। दंपति ने प्रिया के बेबी बंप की तस्वीरें साझा कीं। सितारों और प्रशंसकों ने उन्हें बधाई संदेशों की बौछार की। उन्होंने 2014 में शादी की और 2023 में अपने पहले बच्चे का स्वागत किया।