Join us
Daily Top 2Weekly Top 5

"मी बिजनेसमॅनशी लग्न केलं, मला चार मुलं...", प्रसिद्ध अभिनेत्रीची पोस्ट चर्चेत, इंडस्ट्री सोडल्याच्या चर्चांवर थेटच बोलली

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2026 17:41 IST

तृषाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने तिच्या पर्सनल लाइफबाबत अपडेट देणाऱ्या काही अफवांवर थेट भाष्य केलं आहे. इंडस्ट्री सोडल्याच्या चर्चांनाही तिने पोस्टमधून उत्तर दिलं आहे. 

साऊथ अभिनेत्री तृषा कृष्णन पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. मात्र यावेळेस ती अभिनेता थलपति विजयसोबतच्या नात्यामुळे नव्हे तर एका पोस्टमुळे चर्चेत आली आहे. तृषाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने तिच्या पर्सनल लाइफबाबत अपडेट देणाऱ्या काही अफवांवर थेट भाष्य केलं आहे. इंडस्ट्री सोडल्याच्या चर्चांनाही तिने पोस्टमधून उत्तर दिलं आहे. 

तृषाने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या स्टोरीमध्ये असं म्हटलं आहे की "मी सिनेइंडस्ट्री सोडली आहे. एका बिजनेसमॅनसोबत मी लग्न केलं आहे आणि ४ मुलांची आई झाली आहे. ती मुलं २ वर्षांची झाली आहेत. अजून काही राहिलं आहे का? की आजच्या अफवांचा कोटा भरला आहे?". तृषाने या पोस्टमधून तिच्याबद्दलच्या सर्व अफवांना पूर्णविराम दिला आहे. 

तृषा सध्या साऊथ सुपरस्टार थलपति विजयसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. गेल्या काही वर्षांपासून ते रिलेशनशिपमध्ये असल्याचा आरोप थलपति विजयच्या पत्नीने केला होता. थलपति विजय आणि त्याच्या पत्नीने घटस्फोटासाठी अर्ज केला आहे. तृषा आणि थलपति विजय यांनी अनेक सिनेमांमध्ये एकत्र काम केलं आहे. नुकतंच एका लग्नातही त्यांनी एकत्र हजेरी लावली होती. 

English
हिंदी सारांश
Web Title : Trisha Krishnan slams rumors: Marriage, kids, industry exit clarified.

Web Summary : South actress Trisha Krishnan addressed rumors about her marriage to a businessman, having four children, and leaving the film industry. She clarified these claims in an Instagram post, dismissing speculation about her personal life and career choices amid rumors of relationship with Thalapathy Vijay.
टॅग्स :Tollywoodसेलिब्रिटी