Join us
Daily Top 2Weekly Top 5

वयाच्या २० व्या वर्षीच यशस्वी अभिनेत्री, २२ व्या वर्षी केली आत्महत्या; बॉयफ्रेंडनेही प्यायलं विष पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2025 11:11 IST

सिनेसृष्टीत ती एकेकाळची सर्वात सुंदर आणि गुणी अभिनेत्री होती.

मनोरंजनसृष्टीत अनेक कलाकारांचं अकस्मात निधन झाल्याचं वाचलं असेलच. अशीच एक अभिनेत्री जिच्या सौंदर्यावर अख्खं जग फिदा होतं. वयाच्या २० व्या वर्षीच तिला कमालीचं यश मिळालं होतं. पाचच वर्षात तिने ११ सिनेमांमध्ये काम केलं. मात्र २००२ साली वयाच्या केवळ २२ व्या वर्षी तिने आत्महत्या केली. तिने इतकं टोकाचं पाऊल उचलल्याने सिनेसृष्टी हादरली होती.  प्रत्युषाने आयुष्य संपवण्याचा निर्णय का घेतला?

ही होती साउथ अभिनेत्री प्रत्युषा (Pratyusha). दाक्षिणात्य सिनेसृष्टीत ती एकेकाळची सर्वात सुंदर आणि गुणी अभिनेत्री होती. १९९८ साली तिने अभिनयाला सुरुवात केली. मोहन बाबूसोबत तिने पहिला सिनेमा केला. तेव्हा ती फक्त १८ वर्षांची होती. तिला लगेच आणखी दोन सिनेमांची ऑफर होती. १९९९ साली तिने तमिळ सिनेसृष्टीत पदार्पण केलं. तिचं फिल्मी करिअर खूपच जोरात होतं. मात्र वैयक्तिक आयुष्यात प्रेमप्रकरणातून तिने आत्महत्या केली. 

वयाच्या २२ व्या वर्षी आत्महत्या

प्रत्युषाचं सिद्धार्थ रेड्डीवर लहानपणापासूनच प्रेम होतं. दोघंही रिलेशनशिपमध्ये होते. मात्र सिद्धार्थच्या कुटुंबियांनी लग्नाला विरोध केला होता. अखेर दोघांनी एकत्रच जीवन संपवण्याचा निर्णय घेतला. २००२ साली त्यांनी विष पिऊन आत्महत्या केली. यात प्रत्युषाचा मृत्यू झाला मात्र सिद्धार्थ वाचला. नंतर पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये प्रत्युषाची हत्या झाल्याचं समोर आलं. फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये तिचा मृत्यू गळा आवळल्याने झाला असं आलं. मृत्यूपूर्वी तिचा बलात्कार केल्याचंही बोललं गेलं. तेव्हा याच प्रकरणाची खूप चर्चा होती. प्रकरण सीबीआयकडे गेलं. अखेर सीबीआयने प्रत्युषाचा मृत्यू हा आत्महत्याच असल्याचा निष्कर्ष दिला. तसंच तिला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याप्रकरणी सिद्धार्थला दोषी ठरवलं. कोर्टाने सिद्धार्थला ६ हजार रुपयांचा दंड आणि पाच वर्षांचा तुरुंगवास ठोठावला. मात्र प्रत्युषाची आई आजही तिचा मृत्यू हा खूनच असल्याचं मानत आहे.

टॅग्स :Tollywoodसेलिब्रिटी