Fahadh Faasil : दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील हरहुन्नरी अभिनेता म्हणजे फहाद फासिल(Fahadh Faasil). एकापेक्षा एक सुपरहिट सिनेमे देणारा हा अभिनेता पुष्पा चित्रपटात साकारलेल्या खलनायकाच्या भूमिकेतून प्रसिद्धीझोतात आला. 'पुष्पा'मधील 'भंवर सिंह शेखावत' या भुमिकेतून फहाद फासिलनं आपली छाप सोडली. या चित्रपटातील धाकड परफॉर्मन्सनंतर फहाद फासिलची प्रचंड क्रेझ भारतात निर्माण झाली. आजवर वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका साकारत त्याने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.मात्र, एक वेळ अशी आली होती जेव्हा या अभिनेत्याने नैराश्यामुळे इंडस्ट्री सोडण्याचा निर्णय घेतला होता. नेमकं काय घडलं होतं, जाणून घ्या....
फहाद फासिलचे वडील हे दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध निर्माते आहेत. त्यांनी Kaiyethum Doorath चित्रपटातून आपल्या मुलाला लॉन्च केलं. परंतु, या चित्रपटाला प्रेक्षकांचा फारसा प्रतिसाद मिळाला नाही. फहादचा डेब्यू सिनेमा फ्लॉप झाल्याने अभिनेत्याला खूप ट्रोलही करण्यात आलं. याचा फहादवर खूप परिणाम झाला आणि तो डिप्रेशनमध्ये गेला होता आणि तो अभिनयापासून दुरावला गेला.
अभिनय सोडून परदेशात झालेला स्थायिक
सिनेसृष्टीत पदार्पण केल्यानंतर पहिल्याच चित्रपट फ्लॉप झाल्याने फहादने अमेरिकेत स्थायिक होण्याचा निर्णय घेतला होता. त्याने ७ वर्षांसाठी चित्रपटांपासून ब्रेक घेतला. त्यावेळी फहाद असंही म्हणाला होता की, त्याच्या अपयशाचं कारण हेच आहे की तयारी न करता आपण इंडस्ट्रीत पाऊल ठेवलं. त्यानंतर काही वर्षानंतर भारतात परतला.
त्यानंतर फहाद २०११ मध्ये आलेल्या ‘चोप्पा कुरीशु’, सारख्या थ्रिलर चित्रपटांमध्ये काम करून तो प्रसिद्धीझोतात आला. या चित्रपटासाठी फहादला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा केरळ राज्य चित्रपट पुरस्कारही मिळाला. यानंतर फहादच्या कारकिर्दीला सुरुवात झाली. मग त्याने मागे वळून पाहिलं नाही. सध्याच्या घडीला हा अभिनेता सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्यांपैकी एक आहे.