'पुष्पा'च्या जागतिक यशानंतर दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुन आता एकामागून एक मोठे चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे. सध्या त्याच्या आगामी 'AA23' या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. या चित्रपटामध्ये अल्लू अर्जूनसोबत आता लोकप्रिय मराठमोळी अभिनेत्री दिसणार असल्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. लोकेश कनगराज दिग्दर्शित या चित्रपटाने प्रदर्शनापूर्वीच सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.
'मनी कंट्रोल'च्या वृत्तानुसार, अॅक्शनने भरपूर असलेल्या या चित्रपटात अल्लू अर्जुनसोबत अभिनेत्री श्रद्धा कपूर स्क्रीन शेअर करताना दिसू शकते. अद्याप निर्मात्यांनी यावर अधिकृत शिक्कामोर्तब केले नसले तरी, सोशल मीडियावर चाहत्यांनी या नवीन जोडीचे स्वागत केले आहे. 'पुष्पा' प्रमाणेच हा चित्रपट देखील संपूर्ण भारतात प्रदर्शित होणार आहे.
'AA23' या चित्रपटाचे आणखी एक आकर्षण म्हणजे दिग्दर्शक लोकेश कनगराज आणि संगीतकार अनिरुद्ध रविचंदर. लोकेशच्या युनिव्हर्समधील अॅक्शन आणि अनिरुद्धचे धडाकेबाज संगीत यामुळे 'AA23' हा २०२६ मधील सर्वात मोठा चित्रपट मानला जात आहे. १४ जानेवारी रोजी एका लघु टीझरद्वारे या चित्रपटाची अधिकृत घोषणा करण्यात आली होती. या चित्रपटाचे चित्रीकरण याच वर्षी म्हणजेच २०२६ मध्ये सुरू होणार आहे. सध्या 'AA23' हे तात्पुरते शीर्षक असून, लवकरच चित्रपटाच्या मूळ नावाचा खुलासा होण्याची शक्यता आहे.
Web Summary : Allu Arjun's 'AA23', directed by Lokesh Kanagaraj, might star a Marathi actress, possibly Shraddha Kapoor. The action-packed film, with music by Anirudh Ravichander, is highly anticipated for 2026. Official announcement was made via a teaser.
Web Summary : अल्लू अर्जुन की 'AA23', लोकेश कनगराज द्वारा निर्देशित, में मराठी अभिनेत्री, शायद श्रद्धा कपूर, हो सकती हैं। अनिरुद्ध रविचंदर के संगीत के साथ एक्शन से भरपूर फिल्म 2026 के लिए बहुप्रतीक्षित है। टीज़र द्वारा आधिकारिक घोषणा की गई।