मनोरंजन सृष्टीतून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. अभिनेता भरत कांत याचा एका भीषण रस्ते अपघातातमृत्यू झाला आहे. या अपघातात त्याच्यासोबत असलेले प्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर जी. साई त्रिलोक यांचाही जागीच मृत्यू झाला आहे. दोघंही ३१ वर्षांचे होते.
ट्रक आणि कारची भीषण धडक
ANI ने दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात हैदराबादच्या आऊटर रिंग रोडवर झाला. आदिबतला भागातील पोलीस ठाणे येथील एक्झिट नंबर १२ जवळ भरत कांतच्या कारने पुढे जाणाऱ्या एका कंटेनर ट्रकला मागून जोरात धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की कारचा चक्काचूर झाला आणि दोघांचाही जागीच मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, भरत कांत आणि त्रिलोक हे दोघेही आंध्र प्रदेशातील नेल्लोर जिल्ह्याचे रहिवासी होते. शनिवारी रात्री ते नेल्लोरवरून हैदराबादकडे येण्यासाठी निघाले होते. रविवारी पहाटे ३ च्या सुमारास त्यांची गाडी आऊटर रिंग रोडवर असताना हा अपघात झाला. त्यांच्या फोनवरून आणि गाडीच्या नंबरवरून ओळख पटवण्यात आली आहे.
आदिबतला पोलिसांनी या घटनेची नोंद केली असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. प्राथमिक अंदाजानुसार, निष्काळजीपणाने गाडी चालवणे किंवा वेगावर नियंत्रण न राहणे हे अपघाताचे मुख्य कारण असू शकते, असे मानले जात आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
चित्रपटसृष्टीतील करिअर
भरत कांत हा एक नवोदित अभिनेता होता, तर त्रिलोक हे कॅमेरामन म्हणून कार्यरत होते. दोघेही सुमारे १० वर्षांपूर्वी चित्रपटसृष्टीत नशीब आजमावण्यासाठी हैदराबादला आले होते. मेहनतीच्या जोरावर त्यांनी आपली ओळख निर्माण करण्यास सुरुवात केली होती. पण त्यांच्या निधनामुळे सर्वांना धक्का बसला. याशिवाय तेलुगू चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली असून अनेक सेलिब्रिटींनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
Web Summary : Actor Bharat and cinematographer Trilok died in a car accident near Hyderabad. The car collided with a truck, killing both 31-year-olds instantly. Police are investigating, suspecting negligent driving. The Telugu film industry is in mourning.
Web Summary : हैदराबाद के पास एक कार दुर्घटना में अभिनेता भरत और सिनेमैटोग्राफर त्रिलोक की मौत हो गई। कार एक ट्रक से टकरा गई, जिससे दोनों 31 वर्षीय लोगों की मौके पर ही मौत हो गई। पुलिस लापरवाही से गाड़ी चलाने के संदेह में जांच कर रही है। तेलुगु फिल्म उद्योग में शोक है।