Join us
Daily Top 2Weekly Top 5

समांथा रुथ प्रभूने गुपचुप केलं दुसरं लग्न? 'द फॅमिली मॅन'च्या दिग्दर्शकासोबत संसार थाटल्याच्या चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2025 12:17 IST

नागा चैतन्यसोबत घटस्फोट घेतल्यानंतर समांथा दिग्दर्शक राज निदिमोरुला डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. त्यांना एकत्र स्पॉटही करण्यात आलं होतं. एवढंच नव्हे तर समांथाने राजच्या कुटुंबीयांसोबत दिवाळीही साजरी केली होती. त्यामुळे त्यांच्या नात्यावर शिक्कामोर्तब झालं होतं. आता. समांथा आणि राज निदिमोरुला यांनी लग्न केल्याच्या चर्चा आहेत. 

साऊथ ब्युटी समांथा रुथ प्रभू तिच्या पर्सनल आयुष्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. नागा चैतन्यसोबत घटस्फोट घेतल्यानंतर समांथा दिग्दर्शक राज निदिमोरुला डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. त्यांना एकत्र स्पॉटही करण्यात आलं होतं. एवढंच नव्हे तर समांथाने राजच्या कुटुंबीयांसोबत दिवाळीही साजरी केली होती. त्यामुळे त्यांच्या नात्यावर शिक्कामोर्तब झालं होतं. आता. समांथा आणि राज निदिमोरुला यांनी लग्न केल्याच्या चर्चा आहेत. 

हिंदुस्तान टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, समांथा आणि राज निदिमोरुला यांनी आज (१ डिसेंबर) सकाळीच लिंग भैरवी मंदिरात पारंपरिक पद्धतीने लग्नगाठ बांधली. कुटुंबीय आणि नातेवाईक अशा अगदी मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत समांथा आणि राज निदिमोरुला लग्नाच्या बेडीत अडकले आहेत. समांथाने लग्नासाठी लाल रंगाची साडी नेसली होती, अशी माहितीही हिंदुस्तान टाइम्सच्या सूत्रांनी दिली आहे. समांथा आणि राज यांनी लग्न केल्यानंतर दिग्दर्शकाच्या एक्स पत्नीने सोशल मीडियावर क्रिप्टिक पोस्ट शेअर केली आहे. “हतबल माणसं हतबलच गोष्टी करतात", असं त्या पोस्टमध्ये म्हटलं गेलं आहे. 

दरम्यान, समांथाने २०१७ मध्ये नागा चैतन्यशी लग्न केलं होतं. मात्र लग्नानंतर ४ वर्षांनी घटस्फोट घेत ते वेगळे झाले. २०२१ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला होता. आता पुन्हा समांथाने तिच्या नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. समांथाने अनेकदा राजसोबतचे फोटो शेअर केले होते. तिची सिटाडेल हनीबनी ही वेब सीरिज त्यांनीच दिग्दर्शित केली होती. याच सेटवर ते प्रेमात पडले होते. 

English
हिंदी सारांश
Web Title : Samantha Ruth Prabhu rumored to marry 'The Family Man' director.

Web Summary : Samantha Ruth Prabhu is rumored to have married director Raj Nidimoru in a private ceremony. This follows her divorce from Naga Chaitanya. Nidimoru's ex-wife has posted cryptic messages online. They reportedly fell in love on the set of 'Citadel Honey Bunny'.
टॅग्स :समांथा अक्कीनेनीसेलिब्रेटी वेडिंग