साऊथ सिनेसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री असलेली समांथा रुथ प्रभू नव्या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. समांथाच्या 'मां इंटी बंगाराम' या सिनेमाचं नवं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं असून रिलीज डेटही जाहीर करण्यात आली आहे. या सिनेमात समांथा अॅक्शन मोडमध्ये दिसणार आहे. येत्या १९ जूनला हा सिनेमा सर्वत्र प्रदर्शित केला जाणार आहे.
'मां इंटी बंगाराम' सिनेमाच्या नव्या पोस्टरने चाहत्यांची उत्सुकता वाढवली आहे. या पोस्टरवर समांथाचा डॅशिंग अवतार पाहायला मिळत आहे. लाल रंगाच्या साडीमध्ये एका साध्या महिलेसारखा लूक दिसत आहे. पण, तिच्या हातातली बंदूक आणि डोळ्यांतील आग यामुळे तिचा हा अवतार थरारक वाटत आहे. समांथाने तिच्या 'मा इंती बंगाराम' सिनेमाचं हे नवं पोस्टर सोशल मीडियावरुन शेअर केलं आहे. हे पोस्टर पाहून चाहते तिच्या सिनेमासाठी आणखीच उस्तुक झाले आहेत.
विशेष म्हणजे 'मां इंटी बंगाराम' या चित्रपटाची निर्मिती समांथाचा पती राज निदिमोरू आणि डीके यांनी केली आहे. तर दिग्दर्शन नंदिनी रेड्डी यांनी केले आहे. समांथाने यापूर्वी राज आणि डीके यांच्यासोबत 'द फॅमिली मॅन २' आणि 'सिटाडेल: हनी बनी' यांसारख्या सुपरहिट वेब सीरीजमध्ये काम केले आहे.
Web Summary : Samantha Ruth Prabhu's new film 'Ma Inti Bangaram' releases June 19. The poster shows her in action, a simple woman with a gun and fiery eyes. Produced by her husband and directed by Nandini Reddy, Samantha previously worked with the producers on 'The Family Man 2'.
Web Summary : समांथा रुथ प्रभु की नई फिल्म 'मां इंटि बंगाराम' 19 जून को रिलीज होगी। पोस्टर में वह एक्शन में दिख रही हैं, एक साधारण महिला जिसके हाथ में बंदूक और आंखों में आग है। उनके पति द्वारा निर्मित और नंदिनी रेड्डी द्वारा निर्देशित, समांथा ने पहले 'द फैमिली मैन 2' में काम किया।