Join us
Daily Top 2Weekly Top 5

समांथाच्या आयुष्यात 'या' लोकांना 'नो एन्ट्री', म्हणाली "तर मी तुम्हाला ब्लॉक करेन"

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2026 12:49 IST

"तुमची आता येथे गरज नाही" समांथाने कोणाला दिला ब्लॉक करण्याचा इशारा?

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री समांथा रूथ प्रभू सध्या तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. नुकतंच अभिनेत्रीच्या 'माँ इंटी बंगाराम' या चित्रपटाची रिलीज डेट समोर आली आहे. अशातच समांथाने इन्स्टाग्रामवर 'आस्क मी एनिथिंग' हे सेशन ठेवलं होतं. या सेशन दरम्यान तिनं आपल्या चाहत्यांशी संवाद साधला. ज्यामध्ये समांथाने ट्रोलर्स आणि सोशल मीडियावरील नकारात्मकतेला ती कशी सामोरी जाते, यावर खुलासा केला. 

'आस्क मी एनिथिंग' या सेशन दरम्यान सोशल मीडियावरील कौतुक आणि टीका या दोन्ही गोष्टी ती कशी हाताळते, असा प्रश्न एका चाहत्याने समांथाला विचारला होता. त्यावर उत्तर देताना समांथा म्हणाली, "मला कौतुकाची फारशी पर्वा नाही आणि ट्रोलर्सचीही नाही. पण जर तुम्ही माझ्या घरात नकारात्मकता आणली, तर मी तुम्हाला ब्लॉक करेन. ज्याप्रमाणे मी माझे घर स्वच्छ ठेवते, तसेच मी हे पेज देखील स्वच्छ ठेवते. ब्लॉक करण्याचा अर्थ असा नाही की तुमच्या टीकेचा माझ्यावर परिणाम झाला आहे, त्याचा अर्थ असा आहे की आता येथे तुमचे स्वागत केले जाणार नाही". समांथाच्या या स्पष्टवक्तेपणाचे सोशल मीडियावर भरभरून कौतुक होत आहे.

वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यसमांथाने गेल्या वर्षी प्रसिद्ध चित्रपट निर्माते राज निदिमोरूशी १ डिसेंबर २०२५ लग्नगाठ बांधली. कामाबद्दल बोलायचं झाल्यास तिचा आगामी चित्रपट 'माँ इंटी बंगाराम' येत्या १५ मे २०२६ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाची सह-निर्मिती राज निदिमोरू, समांथा आणि हिमांक दुव्वुरु यांनी केली आहे. याशिवाय समांथा ही 'राज आणि डीके' यांच्या 'रक्त ब्रह्मांड: द ब्लडी किंगडम' या बहुचर्चित वेबसीरिजमध्येही एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. एकामागून एक अ‍ॅक्शन-पॅक प्रोजेक्ट्समुळे समांथा २०२६ मध्ये बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज झाली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Samantha sets boundaries: 'No entry' for negativity, block if needed.

Web Summary : Samantha Ruth Prabhu addresses trolls and negativity during an 'Ask Me Anything' session. She emphasizes blocking those who bring negativity to her space, prioritizing a clean environment. Her film 'Maa Inti Bangaram' releases May 15, 2026. She's also in 'Rakt Brahmand: The Bloody Kingdom'.
टॅग्स :समांथा रुथ प्रभूसोशल मीडिया