Join us
Daily Top 2Weekly Top 5

१४८ मिनिटांचा हॉरर-थ्रिलर, ओटीटीवर ट्रेंडिंग आहे 'हा' सिनेमा! एकट्याने पाहायला धाडस हवं 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2026 15:29 IST

मेडिकल कॉलेजमध्ये रहस्यमयरित्या मृत्यू होतात अन्; ३ दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या या हॉरर-थ्रिलर सिनेमाचा ओटीटीवर धुमाकूळ 

OTT Movies: ओटीटीवर दर आठवड्याला वेगवेगळ्या जॉनरचे चित्रपट प्रदर्शित होतात. मात्र, हॉरर कॉमेडी, क्राइम थ्रिलर, या जॉनरच्या चित्रपटांची सिनेप्रेमींमध्ये प्रचंड क्रेझ पाहायला मिळते. या जॉनरचे चित्रपट पाहाणारा एक वेगळाच प्रेक्षकवर्ग आहे. अशाच एका चित्रपटाची ओटीटीप्रेमींमध्ये चर्चा रंगली आहे.  २०२५ मध्ये थिएटर्स गाजवल्यानंतर आता हा चित्रपट २०२६ मध्ये ओटीटीवर प्रदर्शित झाला असून तो सध्या प्रचंड ट्रेंड होत आहे. 

दरम्यान, 'तमिळ रॉकर्स' फेम दिग्दर्शक अरिवझगन यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेल्या या सिनेमाचं नाव शब्दम असं आहे. अलिकडेच २४ मार्च २०२६ रोजी हा चित्रपट  ओटीटीवर प्रदर्शित करण्यात आला आहे. 'शब्दम' झी5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर स्ट्रीम होत आहे.

असं आहे कथानक...

'शब्दम्'ची कथा एका पॅरानॉर्मल इन्व्हेस्टिगेटर भोवती फिरते. मुन्नारमधील एका मेडिकल कॉलेजमध्ये अचानक काही रहस्यमयरित्या मृत्यू होऊ लागतात. या मृत्यूंमागे कोणतीतरी अलौकिक आणि भयानक शक्ती असल्याचं जाणवतं.  तो डॉ. अवंतिकाच्या मदतीने ४० वर्षांपूर्वीचा एक जुन्या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी कंबर कसतो. ज्यामध्ये लहान मुलांसंबंधित देखील काही प्रकरणे त्याच्या समोर येतात. अखेरीस तो हे सत्य कसं शोधून काढतो, हे पाहून झोप उडल्याशिवाय राहणार नाही.

या चित्रपटात अभिनेता पिनिसेट्टीची प्रमुख भूमिका आहे. त्याच्यासह लक्ष्मी मेनन, सिमरन, लैला, एम.एस. भास्कर आणि राजीव मेनन यांसारखे कलाकार देखील चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत. या चित्रपटाला IMDb वर ६.१ रेटिंग मिळाले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Shabdam: Spine-chilling horror-thriller trends on OTT; watch alone if you dare!

Web Summary : Tamil Rockers director's Shabdam, a paranormal investigation thriller, trends on OTT. Mysterious deaths plague a medical college; an investigator uncovers a 40-year-old secret with Dr. Avantika. The movie stars Pinisetty, Lakshmi Menon, and Simran.
टॅग्स :Tollywoodसिनेमा