Join us
Daily Top 2Weekly Top 5

"मी देवाला मानत नाही..."; 'वाराणसी' इव्हेंटमध्ये राजामौलींचा पारा चढला; हनुमानाचं नाव घेत काय म्हणाले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2025 10:40 IST

नुकताच 'वाराणसी' सिनेमाचा शानदार इव्हेंट सोहळा पार पडला. या इव्हेंटमध्ये राजामौलींनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे

 'वाराणसी' सिनेमाचा इव्हेंट १५  नोव्हेंबर रोजी भव्य पद्धतीने पार पडला.  या इव्हेंटला दिग्दर्शक एस.एस. राजामौली यांसह सिनेमाची संपूर्ण स्टारकास्ट उपस्थित होती. 'वाराणसी' सिनेमातील प्रमुख कलाकार महेश बाबू, अभिनेत्री प्रियंका चौप्रा यांच्या उपस्थितीत सोहळ्याला चार चाँद लागले. या इव्हेंटमध्ये 'वाराणसी' सिनेमाचा खास व्हिडीओ दाखवला जाणार होता. परंतु तांत्रिक अडचणीमुळे हा व्हिडीओ दाखवण्यास उशीर झाला. त्यामुळे राजामौलींचा पारा चढला. त्यांनी केलेल्या विधानाची सध्या सर्वत्र चर्चा 

राजामौली चिडले, काय म्हणाले?

'वाराणसी' कार्यक्रमात काही तांत्रिक समस्या आल्यामुळे दिग्दर्शक राजामौली खूप निराश झाले. त्यांना 'वाराणसी'चा व्हिडीओ सर्वांना दाखवायचा होता. परंतु तांत्रिक अडचण आल्याने हा व्हिडीओ मध्येच थांबवण्यात आला. त्यामुळे राजामौलींचा पारा चढला. ते म्हणाले, ''हा क्षण माझ्यासाठी खूप भावनिक आहे. मी स्वतः देवाला मानत नाही. मी नास्तिक आहे. पण माझे वडील नेहमी म्हणतात की, हनुमानजी सर्व काही सांभाळून घेतील. पण, ते अशा प्रकारे सांभाळून घेतात का? हा विचार करून मला खूप राग येत आहे. जेव्हा माझ्या वडिलांनी हनुमानाचा आशीर्वाद घेण्याबद्दल आणि त्यांच्यावर अवलंबून राहण्याबद्दल सांगितले, तेव्हा मला खूप राग आला."

नेटकऱ्यांचा संताप आणि टीका

राजामौलींच्या या विधानामुळे ते लगेचच ट्रोलर्सच्या निशाण्यावर आले आहेत. अनेक सोशल मीडिया युजर्सनी या वक्तव्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली असून, याला बजरंगबली आणि हिंदू धर्माच्या श्रद्धेचा अपमान म्हटले आहे. एका युजरने लिहिले, "तुम्ही नास्तिक आहात हे सगळ्यांना माहीत आहे, पण यात हनुमानाला ओढू नका. हे विधान अत्यंत लज्जास्पद आहे. जर तुम्ही निराश असाल, तर त्यासाठी तुमच्या टीमला जबाबदार धरा."

इतर युजर्सनी राजामौलींच्या चित्रपटाच्या टायटलवरही प्रश्न उपस्थित केले आहेत. "जर राजामौलींचा देवावर विश्वास नसेल, तर त्यांनी त्यांच्या चित्रपटाचे नाव 'वाराणसी' का ठेवले आणि त्यात पौराणिक पात्रांचा वापर का केला? त्यांना माहीत नाही का, यामुळे लोकांच्या भावना दुखावतात? त्यांच्यासारख्या मोठ्या व्यक्तीकडून ही अपेक्षा नव्हती," अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Rajamouli Upset at Varanasi Event; Remarks on Hanuman Spark Controversy

Web Summary : Director Rajamouli expressed frustration at the 'Varanasi' event due to technical issues. His comments about not believing in God and referencing Hanuman sparked outrage online, with users criticizing his remarks as disrespectful.
टॅग्स :एस.एस. राजमौलीमहेश बाबूप्रियंका चोप्रानम्रता शिरोडकरबॉलिवूडTollywood