Join us

वयाच्या ४० व्या वर्षी प्रसिद्ध अभिनेता दुसऱ्यांदा बाबा होणार, पत्नी जुळ्या बाळांना देणार जन्म

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2025 12:37 IST

प्रसिद्ध अभिनेता दुसऱ्यांदा बाबा होणार असून त्याच्या पत्नीने दिवाळीनिमित्त डोहाळेजेवणाचा व्हिडीओ शेअर करुन ही आनंदाची बातमी सर्वांसोबत शेअर केली

दिवाळीनिमित्त मनोरंजन विश्वातून गोड बातमी समोर आली आहे. अभिनेता राम चरणच्या घरी दिवाळी सणाच्या मुहूर्तावर ही गुडन्यूज समोर आली आहे. राम चरणची पत्नी उपासना कोनिडेलाने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर करून ती दुसऱ्यांदा गरोदर असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळेच वयाच्या ४० व्या वर्षी राम चरण दुसऱ्यांदा बाबा होणार आहे. विशेष म्हणजे त्याची पत्नी जुळ्या बाळांना जन्म देणार आहे.

उपासनाने डोहाळेजेवणाचा व्हिडीओ  शेअर केलाय. हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये मेगास्टार चिरंजीवी (Chiranjeevi) आणि वरुण कोनिडेला (Varun Konidela) यांसारखे त्यांचे जवळचे कुटुंबीय उपस्थित असलेले दिसत आहेत. संपूर्ण कुटुंब एकत्र येऊन हा आनंद साजरा करताना व्हिडिओमध्ये दिसत आहे, ज्यावर चाहत्यांकडून प्रचंड प्रेम आणि अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. 'या दिवाळीत डबल सेलिब्रेशन आणि दुप्पट प्रेम', अशी पोस्ट करुन उपासनाने ही जुळी बाळं होणार असल्याची गोड बातमी सर्वांसोबत शेअर केली आहे.

दोन वर्षांपूर्वी झाला होता मुलीचा जन्म

राम चरण आणि उपासना कोनिडेला यांनी २०१२ मध्ये लग्न केलं होते. लग्नाच्या तब्बल ११ वर्षांनंतर, जून २०२३ मध्ये त्यांना पहिली मुलगी झाली. या चिमुकलीचे नाव त्यांनी क्लिन कारा (Klin Kaara) असं ठेवले आहे. आता क्लिन काराच्या जन्मानंतर अवघ्या दोन वर्षांतच घरात दुसऱ्या पाहुण्याचे आगमन होणार असल्याने राम चरण, उपासना आणि त्यांच्या कुटुंबात आनंदाचं वातावरण आहे. विशेष म्हणजे त्यांना जुळं होणार असल्याने राम चरणचे चाहते या बातमीमुळे खूप उत्साही आहेत आणि सोशल मीडियावर या जोडप्याला शुभेच्छा देत आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Actor Ram Charan, 40, to become father again; Diwali gift.

Web Summary : Actor Ram Charan and Upasana Kamineni are expecting their second child. Upasana shared the news on social media with a video of her baby shower. The couple, who married in 2012, welcomed their first child, Klin Kaara, in June 2023. The family celebrates the double joy this Diwali.
टॅग्स :राम चरण तेजाआरआरआर सिनेमागर्भवती महिला