Join us
Daily Top 2Weekly Top 5

बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणारा ऋषभ शेट्टीचा 'कांतारा' आता मराठीतही पाहता येणार; कधी अन् कुठे बघाल?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2026 10:45 IST

थिएटरमध्ये पाहिला नाही ऋषभ शेट्टीचा 'कांतारा'! आता घरबसल्या मराठीत बघा, जाणून घ्या...

Kanatara A Legend: आपल्या अभिनयाने आणि दिग्दर्शनाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या ऋषभ शेट्टीचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'कांतारा: अ लिजेंड ' हा चित्रपट जगभरात गाजला. ऋषभ शेट्टीची मुख्य भूमिका असलेला या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घातला होता. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली होती. थिएटर गाजवल्यानंतर  हा सिनेमा ओटीटीवर रिलीज करण्यात आला. निसर्गाच्या सानिध्यात राहून उदरनिर्वाह करणाऱ्यांचे रक्षण करणाऱ्या देवीची कथा या चित्रपटाच्या माध्यमातून लेखक-दिग्दर्शक ऋषभ शेट्टीने जिवंत केली. 

'कांतारा- अ लीजेंड' या चित्रपटात ऋषभ शेट्टीशिवाय,अभिनेते गुलशन देवैया आणि रुक्मिणी वसंत देखील मुख्य भूमिकेत आहेत. 2022 साली रीलिज झालेल्या 'कांतारा' या चित्रपटाचा हा प्रीक्वेल आहे.  दरम्यान, हा सिनेमा मल्याळम, तेलुगू, तामिळ आणि कन्नड या भाषांमध्ये ॲमेझॉन प्राइम व्हिडीओवर प्रदर्शित झाला आणि त्याला तितकाच उत्तम प्रतिसाद मिळाला. आता हा चित्रपट प्रेक्षकांना घरबसल्या पाहता येणार आहे.

या चित्रपटाची आगवेळी कथा, कलाकारांचा अभिनय या सगळ्या गोष्टी जुळून आल्याने प्रेक्षकांसह समीक्षकांनी चित्रपटाचं भरभरून कौतुक केलं. त्यात आता झी मराठीच्या अधिकृत सोशल मीडियावर 'कांतारा- अ लीजेंड' सिनेमाबाबत माहिती देण्यात आली आहे. 'पहिल्यांदाच आपल्या माय मराठीत पाहायला मिळणार 'कांतारा'', असं कॅप्शन देत झी मराठीच्या अधिकृत सोशल मीडिया पेजवर सिनेमाचा प्रोमो शेअर करण्यात आला आहे.त्यामुळे सिनेरसिक देखील प्रचंड उत्सुक आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Rishab Shetty's Blockbuster 'Kantara' to Premiere in Marathi Soon!

Web Summary : Rishab Shetty's 'Kantara: A Legend,' a global hit, is coming to Marathi. The film, praised for its unique story and acting, will soon be available for Marathi-speaking audiences after its successful run in other languages.
टॅग्स :ऋषभ शेट्टीकांताराTollywoodसेलिब्रिटी