Join us
Daily Top 2Weekly Top 5

क्या बात! रश्मिका-विजयच्या वेडिंग व्हिडीओचा ग्लोबल रेकॉर्ड; विराट कोहलीनंतर आता रोनाल्डो-मेसीलाही टाकलं मागे

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2026 14:35 IST

विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना लग्नातील एका खास व्हिडिओने इंटरनेटवर इतिहास रचला आहे. या व्हिडिओने फुटबॉलच्या दिग्गज खेळाडू लिओनेल मेसी आणि क्रिस्टियानो रोनाल्डो यांच्या आयकॉनिक कॅम्पेन पोस्टलाही मागे टाकले आहे आणि इन्स्टाग्रामवर रेकॉर्ड रचला आहे. 

विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना हे साऊथमधील लोकप्रिय कपल २६ फेब्रुवारीला लग्नाच्या बेडीत अडकले. त्यांचं लग्न हे केवळ एक सेलिब्रिटी सेलिब्रेशन नव्हे तर ते सुंदर सांस्कृतिक क्षणांची झलक देणारं ठरलं. त्यांच्या लग्नातील भावनिक क्षण आणि खास आठवणी दाखवणारे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. आता त्यांच्या लग्नातील एका खास व्हिडिओने इंटरनेटवर इतिहास रचला आहे. या व्हिडिओने फुटबॉलच्या दिग्गज खेळाडू लिओनेल मेसी आणि क्रिस्टियानो रोनाल्डो यांच्या आयकॉनिक कॅम्पेन पोस्टलाही मागे टाकले आहे आणि इन्स्टाग्रामवर रेकॉर्ड रचला आहे. 

लग्नानंतर रश्मिका आणि विजयने लग्नाचा एक मजेशीर व्हिडीओ शेअर केला होता. यामध्ये त्यांच्या आऊटफिटबद्दल ते बोलत होते. मान्यवर या ब्रँडचा हा व्हिडीओ होता. या व्हिडीओला इन्स्टाग्रामवर तब्बल ८.४ मिलियन लाइक्स मिळाले आहेत. याआधी एका ब्रँडकडून पोस्ट करण्यात आलेल्या फुटबॉलपटू क्रिस्टियानो रोनाल्डो आणि लिओनेल मेसी यांच्या एका व्हिडीओला सर्वाधिक म्हणजेच ८.१ मिलियन लाईक्स मिळाले होते. आता विजय आणि रश्मिकाच्या या व्हिडिओने यांचा रेकॉर्ड मोडत एक नवीन ग्लोबल रेकॉर्ड प्रस्थापित केला आहे.

विशेष म्हणजे, हा विक्रम फक्त आकड्यांपुरता मर्यादित नाही. चाहत्यांचे म्हणणे आहे की या व्हिडिओमध्ये त्या खास क्षणातील भावना अत्यंत सुंदर पद्धतीने दाखवण्यात आल्या आहेत. ज्यात प्रेम, परंपरा आणि एकत्र असण्याचा आनंद स्पष्टपणे दिसून येतो. लग्नातील म्युझिकल गाणे आणि दोघांची नैसर्गिक केमिस्ट्रीही लोकांना खूप आवडली आहे.

भव्य व्हिज्युअल्स आणि आधीच व्हायरल झालेल्या गाण्यामुळे हे लग्न सध्या सर्वत्र ट्रेंड होत आहे. फोटो, रील्स आणि व्हिडिओ सतत सोशल मीडियावर चर्चेत आहेत. त्यामुळे विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना यांचे लग्न आता इंटरनेटवरील सर्वाधिक चर्चेत राहिलेल्या आणि सर्वाधिक पसंती मिळालेल्या सेलिब्रिटी लग्नांपैकी एक ठरले आहेत. 

English
हिंदी सारांश
Web Title : Rashmika-Vijay Wedding Video Breaks Global Record, Surpassing Ronaldo and Messi!

Web Summary : Rashmika and Vijay's wedding video garnered 8.4 million likes on Instagram, surpassing Ronaldo and Messi's campaign post. The video, showcasing their outfits and joyful moments, resonated with fans, making it a globally trending celebration of love and tradition.
टॅग्स :रश्मिका मंदानाविजय देवरकोंडासेलिब्रेटी वेडिंग