साऊथमधील सेलिब्रिटी कपल रश्मिका मंदाना आणि विजय देवराकोंडा लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. रश्मिका आणि विजय यांनी काही महिन्यांपूर्वीच गुपचूप साखरपुडा केला होता. आता ते गुपचूप लग्नही करणार असल्याच्या चर्चा आहेत. सोशल मीडियावर रश्मिका-विजयच्या लग्नाची पत्रिकाही व्हायरल झाली होती. त्यानुसार रश्मिका-विजय येत्या २६ फेब्रुवारीला लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. आता त्यांच्या लग्नाबाबत काही माहितीही समोर आली आहे.
रश्मिका-विजय लग्न हे अगदी मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. या लग्नात कुटुंबीय, नातेवाईक आणि जवळच्या मित्रमैत्रिणींना आमंत्रण देण्यात आलं आहे. रश्मिका-विजयच्या लग्नात एकही सेलिब्रिटी दिसणार नाहीये. या लग्नासाठी सेलिब्रिटींना बोलवण्यात आलेलं नाही. तसंच रश्मिका-विजयच्या लग्नात येणाऱ्या पाहुण्यांना काही नियमांचं पालन करावं लागणार आहे. रश्मिका-विजयच्या लग्नसोहळ्यात नो फोन पॉलिसी आहे. त्यामुळे लग्नातील पाहुण्यांना फोन वापरता येणार नाही.
रश्मिका-विजय २६ फेब्रुवारीला लग्न करणार आहेत. तर ४ मार्चला हैदराबाद येथे त्यांचं वेडिंग रिसेप्शन आहे. कृष्णा बंजारा हिल्स हैदराबाद येथे हे वेडिंग रिसेप्शन होणार आहे. त्यांच्या वेडिंग रिसेप्शनचं आमंत्रण अनेक सेलिब्रिटींना देण्यात आलं आहे. गेल्या काही वर्षांपासून रश्मिका-विजय रिलेशनशिपमध्ये आहेत.
Web Summary : Rashmika Mandanna and Vijay Devarakonda are reportedly marrying on February 26th in a private ceremony. Celebrities are not invited, and a no-phone policy will be enforced. A wedding reception will be held in Hyderabad on March 4th for celebrity guests.
Web Summary : खबर है कि रश्मिका मंदाना और विजय देवरकोंडा 26 फरवरी को एक निजी समारोह में शादी कर रहे हैं। समारोह में कोई भी सेलिब्रिटी आमंत्रित नहीं है, और नो-फोन पॉलिसी लागू की जाएगी। सेलिब्रिटी मेहमानों के लिए 4 मार्च को हैदराबाद में एक वेडिंग रिसेप्शन आयोजित किया जाएगा।