Rashmika Mandanna-Vijay Deverakonda Wedding: रश्मिका मंदाना आणि विजय देवराकोंडा हे साऊथमधील लोकप्रिय कपल आज लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत रश्मिका आणि विजय पारंपरिक पद्धतीने लग्नगाठ बांधणार आहेत. उदयपूरमध्ये त्यांचा शाही विवाहसोहळा पार पडत आहे. लग्नाच्या आधी रश्मिका आणि विजयचा हळदी आणि संगीत समारंभ पार पडला. त्यांच्या हळदीचे फोटो समोर आले आहेत.
हळदी समारंभासाठी रश्मिकाने खास पिवळ्या रंगाचा लेहेंगा घातला होता. रश्मिका आणि विजय हळदीच्या रंगात न्हाऊन निघाले. या हळदी समारंभातील काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यातील रश्मिकाच्या फोटोने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. रश्मिकाच्या चेहऱ्यावर आनंद दिसत आहे. विजय आणि रश्मिकानेही त्यांच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये हळदी समारंभाची झलक काही फोटोंमधून दाखवली होती.
रश्मिका आणि विजय गेल्या काही वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. गेल्या वर्षी त्यांनी गुपचूप साखरपुडा केला होता. काही दिवसांपूर्वीच प्रेमाची कबुली देत रश्मिका विजयने त्यांच्या लग्नाची बातमी चाहत्यांना दिली होती. आता ते सप्तपदी घेत नव्या आयुष्याला सुरुवात करणार आहेत. तर रश्मिका आणि विजयच्या लग्नाला अगदी मोजक्या पाहुण्यांना आमंत्रण दिलं गेलं आहे. ७ मार्चला हैदराबादमध्ये त्यांचं वेडिंग रिसेप्शन ठेवण्यात आलं आहे.
Web Summary : Rashmika Mandanna and Vijay Deverakonda are reportedly getting married in Udaipur. Haldi ceremony photos are viral. The couple will host a reception in Hyderabad.
Web Summary : खबर है कि रश्मिका मंदाना और विजय देवरकोंडा उदयपुर में शादी कर रहे हैं। हल्दी समारोह की तस्वीरें वायरल हो रही हैं। कपल हैदराबाद में रिसेप्शन देगा।