Join us
Daily Top 2Weekly Top 5

"आम्ही आता तिघं आहोत"; लग्नाच्या महिन्याभरातच रश्मिका-विजयने दिली आनंदाची बातमी, चाहत्यांकडून अभिनंदन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2026 12:48 IST

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय जोडी रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांनी काही दिवसांपूर्वी राजस्थानमधील उदयपूर येथील आयटीसी मेमेंटोस  या ठिकाणी थाटामाटात लग्न केले

दाक्षिणात्य आणि बॉलिवूडची 'नॅशनल क्रश' रश्मिका मंदाना सध्या तिच्या एका सोशल मीडिया पोस्टमुळे प्रचंड चर्चेत आली आहे. रश्मिकाने नुकतीच एक पोस्ट शेअर केली असून त्यातील कॅप्शनने चाहत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. "आता आम्ही तिघं आहोत" (Now it's us three) असे तिने म्हटल्यामुळे लग्नाच्या महिन्याभरातच रश्मिका प्रेग्नंट आहे का? अशा चर्चा सोशल मीडियावर रंगू लागल्या आहेत. जाणून घ्या सविस्तर

काय आहे रश्मिकाची ती व्हायरल पोस्ट?रश्मिका मंदानाने आपल्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोसोबत तिने लिहिलेले कॅप्शन सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. तिने "आम्ही तिघं" असे म्हटल्यामुळे नेटकऱ्यांनी तर्कवितर्क लढवण्यास सुरुवात केली आहे. अनेकांना असे वाटते की रश्मिका आणि विजय देवरकोंडा यांच्या आयुष्यात लवकरच नव्या पाहुण्याचे आगमन होणार आहे. मात्र, रश्मिकाने अद्याप यावर कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही. 

या व्हिडीओ पोस्टमध्ये रश्मिका-विजय कार्टून रुपात दिसत असून त्यांच्याभोवती एक फूल घुटमळताना दिसतंय. अनेक चाहत्यांनी या दोघांचं कमेंटमध्ये अभिनंदन करत रश्मिका प्रेग्नंट आहे का असा प्रश्न विचारला आहे. परंतु खरी गोष्ट अशी आहे की, रश्मिकाने तिच्या या पोस्टमध्ये terrible tiny tales या पेजला टॅग केलंय. हे पेज गोष्टी सांगणारं एक पेज आहे. त्यामुळेच रश्मिका - विजय आता या पेजच्या माध्यमातून लहान मुलांसाठी गोष्टी सांगणार आहेत, अशी चर्चा आहे. त्यामुळे तूर्तास तरी रश्मिका गरोदर नाही, हे कन्फर्म आहे.

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय जोडी रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांनी २६ फेब्रुवारी २०२६ रोजी राजस्थानमधील उदयपूर येथील आयटीसी मेमेंटोस  या ठिकाणी थाटामाटात लग्न केले. या शाही विवाहात तेलुगू आणि कोडावा परंपरांचा संगम पाहायला मिळाला. 'विरोश' नावाने प्रसिद्ध असलेल्या या जोडीने लग्नाचे फोटो शेअर करत आपल्या प्रेमाची कबुली दिली. सध्या दोघेही आपापल्या प्रोजेक्टसमध्ये व्यस्त आहेत. 

English
हिंदी सारांश
Web Title : Rashmika and Vijay spark pregnancy rumors with cryptic 'three' announcement.

Web Summary : Rashmika Mandanna's social media post, "Now it's us three," fueled pregnancy speculations with Vijay Deverakonda. However, it seems they are collaborating with a storytelling page, clarifying that Rashmika is not currently pregnant, despite earlier wedding reports.
टॅग्स :रश्मिका मंदानाविजय देवरकोंडाबॉलिवूड