Join us
Daily Top 2Weekly Top 5

लग्नानंतर काहीच दिवसांनी कामावर परतली रश्मिका मंदाना, 'मैसा' सिनेमाच्या सेटवरुन शेअर केला फोटो, म्हणते...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2026 15:39 IST

साऊथ ब्युटी रश्मिका मंदाना आणि विजय देवराकोंडा काही दिवसांपूर्वीच लग्नाच्या बेडीत अडकले आहेत. रश्मिका-विजयने २६ फेब्रुवारीला पारंपरिक पद्धतीने लग्नगाठ बांधली. लग्नानंतर काहीच दिवसांनी रश्मिका पुन्हा एकदा कामावर परतली आहे.

साऊथ ब्युटी रश्मिका मंदाना आणि विजय देवराकोंडा काही दिवसांपूर्वीच लग्नाच्या बेडीत अडकले आहेत. रश्मिका-विजयने २६ फेब्रुवारीला पारंपरिक पद्धतीने लग्नगाठ बांधली. त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. लग्नानंतर काहीच दिवसांनी रश्मिका पुन्हा एकदा कामावर परतली आहे. २०२६ मधील चर्चेत असलेल्या ‘मैसा’ (Mysaa) या चित्रपटाच्या शूटिंगला तिने पुन्हा सुरुवात केली आहे. ‘अनफॉर्मूला फिल्म्स’च्या बॅनरखाली तयार होत असलेला हा चित्रपट रश्मिकाच्या करिअरमधील एक मोठा प्रोजेक्ट मानला जात आहे.

या चित्रपटात रश्मिका एका अत्यंत शक्तिशाली आणि उग्र भूमिकेत दिसणार आहे. तिच्या आधीच्या प्रतिमेपेक्षा पूर्णपणे वेगळा अवतार यात पाहायला मिळणार असल्याने चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे. लग्न आणि त्यानंतरच्या सर्व समारंभांनंतर रश्मिका आता अधिकृतपणे चित्रपटाच्या सेटवर परतली आहे. तिने आपल्या इंस्टाग्रामवर दिग्दर्शक रविंद्र यांच्या स्टोरीला रीपोस्ट करत शूटिंगची एक झलक शेअर केली. या व्हिज्युअलमध्ये संपूर्ण टीम मोठ्या आणि मोकळ्या लोकेशनवर शूटिंग करताना दिसत आहे. यावरुन चित्रपटाची कथा गंभीर आणि थरारक असणार असल्याचा अंदाज येतो. या पोस्टसोबत “The Hunt Begins” (शिकार सुरू झाली आहे) असं  कॅप्शन देण्यात आलं आहे.

अलीकडेच मेकर्सनी ‘मैसा’ची पहिली झलकही प्रदर्शित केली होती, ज्याने सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातला. रश्मिकाचा इंटेन्स आणि रॉ लुक, तसेच दमदार बॅकग्राउंड स्कोअरचीही जोरदार चर्चा होत आहे. संगीत आणि जबरदस्त अ‍ॅक्शन सीन्समुळे हा चित्रपट प्रेक्षकांना वेगळा सिनेमॅटिक अनुभव देणार आहे. ‘अनफॉर्मूला फिल्म्स’च्या निर्मितीत आणि रविंद्र पुल्ले यांच्या दिग्दर्शनाखाली बनणारा ‘मैसा’ हा एक इमोशनल अ‍ॅक्शन थ्रिलर चित्रपट आहे. आदिवासी भागावर आधारित असलेली ही कथा भव्य दृश्ये, दमदार कथानक आणि रश्मिकाची लक्षात राहणारी भूमिका यांचे आश्वासन देते.

English
हिंदी सारांश
Web Title : Rashmika Mandanna Returns to Work Soon After Wedding: 'Mysaa' Film Set

Web Summary : Rashmika Mandanna, following her recent marriage to Vijay Deverakonda, has resumed work on the film 'Mysaa'. She shared a glimpse from the set, hinting at an intense and thrilling storyline with action and emotion.
टॅग्स :रश्मिका मंदानाTollywood