अगदी काहीच दिवसांपूर्वी रश्मिका मंदाना आणि विजय देवराकोंडा यांंचं एकमेकांशी थाटामाटात लग्न झालं. रश्मिका आणि विजयच्या लग्नाची खूप चर्चा झाली. पारंपरिक पद्धतीने दोघांनी एकमेकांशी लग्नगाठ बांधली. अशातच रश्मिकाने लग्नाच्या काहीच दिवसांनी तिच्या व्यावसायिक आयुष्याविषयी चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. रश्मिकाने तिच्या आगामी बॉलिवूड सिनेमाबद्दल चाहत्यांना सांगितलं आहे. त्यामुळे रश्मिकाच्या चाहत्यांच्या आनंदाला उधाण आलं आहे.बॉलिवूडमधील लोकप्रिय फ्रँचायझी 'कॉकटेल'चा दुसरा भाग म्हणजेच 'कॉकटेल २' (Cocktail 2) सध्या सिनेप्रेमींमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे. नव्या स्टारकास्टसह आणि वेगळ्या कथानकासह येणाऱ्या या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख निर्मात्यांनी अधिकृतपणे जाहीर केली आहे. हा चित्रपट १९ जून २०२६ रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात रश्मिका मंदानाची खास भूमिका आहे. या चित्रपटाच्या पोस्टरमध्ये रश्मिकाचा खास स्टायलिश लूक सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.
'कॉकटेल २' मध्ये प्रेक्षकांना एक नवी आणि फ्रेश जोडी पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात रश्मिकासोबत शाहिद कपूर मुख्य अभिनेत्याच्या भूमिकेत आहे. याशिवाय बॉलिवूडची 'परम सुंदरी' क्रिती सेननही ळकणार आहेत. या तिघांची केमिस्ट्री पडद्यावर पाहण्यासाठी चाहते आतापासूनच उत्सुक आहेत.चिपटाच्या प्रमोशनची तयारी जोरात सुरू असून, निर्मात्यांनी १८ मार्च रोजी चित्रपटाचा पहिला टीझर प्रदर्शित करण्याचे नियोजन केले आहे. या टीझरद्वारे चित्रपटाच्या कथेची झलक आणि त्यातील पात्रांची ओळख प्रेक्षकांना होणार आहे. 'कॉकटेल'चा पहिला भाग सुपरहिट ठरला होता, त्यामुळे या सिक्वलकडून प्रेक्षकांना मोठ्या अपेक्षा आहेत. लग्नानंतर रश्मिकाचा नवा बॉलिवूड सिनेमा पाहण्यासाठी चाहते आतापासूनच उत्सुक आहेत.
Web Summary : Fresh from her wedding, Rashmika Mandanna thrilled fans by announcing her role in 'Cocktail 2,' releasing June 19, 2026. She stars alongside Shahid Kapoor and Kriti Sanon. The film's teaser arrives March 18, promising a fresh pairing and exciting chemistry.
Web Summary : रश्मिका मंदाना ने शादी के बाद 'कॉकटेल 2' में अपनी भूमिका की घोषणा कर प्रशंसकों को खुश कर दिया। यह फिल्म 19 जून, 2026 को रिलीज होगी। फिल्म में शाहिद कपूर और कृति सेनन भी हैं। टीज़र 18 मार्च को आ रहा है।