Join us
Daily Top 2Weekly Top 5

"२४ तास देते, नंतर कायदेशीर कारवाई करेन...", ८ वर्ष जुन्या ऑडिओवरुन भडकली रश्मिका मंदाना

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2026 17:08 IST

लग्नानंतर काहीच दिवसात रश्मिकासोबत असं काय घडलं?

रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा काही दिवसांपूर्वीच लग्नबंधनात अडकले. राजस्थानमधील एका पॅलेसमध्ये त्यांचा शाही विवाहसोहळा संपन्न झाला. विजय-रश्मिका अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. मात्र कधीच त्यांनी सर्वांसमोर प्रेमाची कबुली दिली नव्हती. लग्नाआधी त्यांनी स्टोरी शेअर करत 'विरोश' असं चाहत्यांनी दिलेलंच हॅशटॅग घेऊन गुडन्यूज दिली. दरम्यान लग्नाला काहीच दिवस होत आहेत तोच रश्मिका एका कारणाने चांगलीच भडकली आहे. काय आहे ते कारण?

रश्मिका मंदानाचा ८ वर्षांपूर्वीचा एक ऑडिओ व्हायरल होतोय. यात तिच्या आईसोबतचं तिचं संभाषण आहे. ८ वर्षांपूर्वी रश्मिकाचा अभिनेता रक्षित शेट्टीसोबत साखरपुडा झाला होता. मात्र त्यांचं नातं लग्नापर्यंत पोहोचलं नाही. रश्मिकानेच नातं तोडलं म्हणत तिच्यावर आरोप केले गेले. तर व्हायरल ऑडिओमध्ये रश्मिकाची आई रक्षित आणि त्याच्या कुटुंबावर अनेक आरोप करत आहे. रश्मिका आणि आईचा हा ऑडिओ विविध प्लऍटफॉर्म्सवर व्हायरल करण्यात येत आहे. यावरुनच रश्मिका संतापली आहे. 

रश्मिकाने ट्वीट करत लिहिले, "गेल्या आठ वर्षांपासून चुकीची माहिती पसरवणे, छळणे आणि मुद्दामून टार्गेट करण्याच्या गोष्टी सुरु आहेत. माझ्या शब्दांचा वारंवार विपर्यास केला गेला आणि केवळ ऑनलाइन एंगेजमेंट वाढवण्यासाठीखोट्या कथा रचल्या गेल्या.

सुमारे आठ वर्षांपूर्वीचे एक खाजगी संभाषण संबंधित व्यक्तींच्या संमतीशिवाय रेकॉर्ड करून आता प्रसारित केले जात आहे. या संभाषणाचा एक छोटासा भाग हेतुपुरस्सर निवडून, त्याचा चुकीचा संदर्भ देऊन नवा वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. हे कृत्य  वैयक्तिक आयुष्यातील घडामोडींशी जोडून जाणीवपूर्वक केले जात आहे.

गेली आठ वर्षे जेव्हा हे फक्त माझ्यापुरते मर्यादित होते, तेव्हा मी शांत राहणे पसंत केले. पण आज जेव्हा इतरांनाही यात ओढले जात आहे, तेव्हा मी आता गप्प बसू शकत नाही. मी आता माझी मर्यादा (boundary) आखत आहे," असे तिने ठामपणे सांगितले.

४. कायदेशीर कारवाईचा इशारारश्मिकाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स, इन्फ्लुएन्सर्स आणि हे साहित्य पसरवणाऱ्या व्यक्तींना ते त्वरित काढून टाकण्याचे आवाहन केले आहे. तिने यासाठी २४ तासांचा अल्टिमेटम दिला आहे. या मुदतीत आशय न हटवल्यास: संबंधित व्यक्ती, डिजिटल प्लॅटफॉर्म आणि मीडिया संस्थांविरुद्ध कायदेशीर नोटीस बजावली जाईल. कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल.

English
हिंदी सारांश
Web Title : Rashmika Mandanna furious over leaked audio, threatens legal action.

Web Summary : Rashmika Mandanna is angered by a leaked 8-year-old audio clip featuring her mother. She is accusing individuals of spreading misinformation and has demanded its removal within 24 hours, threatening legal action.
टॅग्स :रश्मिका मंदानासोशल मीडियाट्रोलTollywood