Join us

अफेअरच्या चर्चेदरम्यान रश्मिका आणि विजय देवराकोंडा तुर्कीमध्ये करत आहेत सुट्ट्या एन्जॉय? 'त्या' फोटोंमुळे चर्चेला उधाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2023 11:04 IST

रश्मिका आणि विजय देवराकोंडा तुर्कीला एकत्र सुट्ट्या एन्जॉय करत असल्याचं म्हटलं जात आहे. त्यांचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. 

गेल्या काही दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना आणि अभिनेता विजय देवराकोंडा यांच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या आहेत. ते दोघे एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. त्यांचे काही फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. आता रश्मिका आणि विजय देवराकोंडा तुर्कीला एकत्र सुट्ट्या एन्जॉय करण्यासाठी गेले असल्याचं म्हटलं जात आहे. त्यांचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. 

रश्मिकाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन तुर्कीतील काही फोटो शेअर केले आहेत. तर दुसरीकडे विजय देवराकोंडाचेही काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. रश्मिका आणि विजयच्या या फोटोंमुळे ते तुर्कीत एकत्र व्हॅकेशन एन्जॉय करत असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. रश्मिकाच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंटही केल्या आहेत. 'इन्स्टंट बॉलिवूड' या इन्स्टाग्राम पेजवरुन रश्मिका आणि देवराकोंडाचे फोटो शेअर करण्यात आले आहेत. 

दरम्यान, विजय देवराकोंडा त्याच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'खुशी' या चित्रपटामुळे चर्चेत होता. या चित्रपटात त्याने दाक्षिणात्य अभिनेत्री समांथा रुथ प्रभूबरोबर स्क्रीन शेअर केली होती. तर रश्मिका 'अनिमल' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात रणबीर कपूर मुख्य भूमिकेत असून रश्मिका महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. 

टॅग्स :विजय देवरकोंडारश्मिका मंदाना