रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) दक्षिण चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. आता तिने बॉलिवूडमध्येही पाऊल टाकले आहे. ती रणबीर कपूरसोबत 'अॅनिमल'मध्ये दिसणार आहे. नुकतेच या चित्रपटातील तिचा फर्स्ट लूक पोस्टरही समोर आले आहे. दरम्यान, तिचा एक्स फियॉन्से रक्षित शेट्टीने एक खुलासा केला आहे. त्याने सांगितले की आजही तो अभिनेत्रीशी बोलतो!
चाहत्यांना वाटले होते की एंगेजमेंट तुटल्यानंतर रश्मिका मंदाना आणि रक्षित शेट्टी यांच्यात कटुता आली असेल, परंतु हे पूर्णपणे चुकीचे आहे. '777 चार्ली' स्टार रक्षितने स्वतः सांगितले आहे की ते कधी कधी मेसेजिंगद्वारे एकमेकांशी बोलतात. किरिक पार्टी या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान रश्मिका को-स्टार रक्षितला डेट करत होती, अशी माहिती आहे. ३ जुलै २०१७ रोजी त्यांची एंगेजमेंट झाली. त्यांच्या गावी हा कार्यक्रम झाला. एक वर्षानंतर, २०१८ मध्ये, दोघांचे नाते संपुष्टात आले.
'किरिक पार्टी'मधून रश्मिकाने अभिनयात केलं पदार्पणरक्षितला रश्मिका आणि ऋषष शेट्टी यांच्या बाँडिंगबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. वास्तविक, रश्मिकाने ऋषभच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या 'किरिक पार्टी' या चित्रपटातून अभिनयाच्या दुनियेत प्रवेश केला होता. या चित्रपटाची निर्मिती रक्षितने केली होती. चित्रपटातही मुख्य भूमिका केली होती. एका मुलाखतीत रश्मिकाने तिच्या पदार्पणाबद्दल सांगितले होते आणि नाव न घेता प्रॉडक्शन हाऊसचा उल्लेख केला होता. अशा परिस्थितीत ऋषभ आणि रक्षितच्या चाहत्यांनी त्यांना वेठीस धरले होते.म्हणून, जेव्हा रक्षितला तिघांमधील सध्याच्या समीकरणाबद्दल विचारण्यात आले तेव्हा तो म्हणाला, 'ऋषभ... मला खात्री नाही (हसत). मी आणि रश्मिका… आम्ही कधी कधी एकमेकांना मेसेज करतो. सतत संपर्कात नसतात. पण जेव्हा जेव्हा माझा चित्रपट प्रदर्शित होतो तेव्हा ती मला शुभेच्छा देते आणि जेव्हाही तिचा चित्रपट प्रदर्शित होतो तेव्हा मी तिला शुभेच्छा देतो. आम्ही एकमेकांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो.
वर्कफ्रंट...वर्क फ्रंटबद्दल सांगायचे तर रक्षित शेट्टी 'Sapta Sagaradaache Ello – Side A' मध्ये दिसला होता. सध्या तो त्याच्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. दरम्यान, रश्मिका तिचा बॉलिवूड चित्रपट 'अॅनिमल' रिलीज होण्याची वाट पाहत आहे, जो १ डिसेंबर २०२३ रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे. याशिवाय तिच्याकडे 'पुष्पा २' आणि 'रेनबो' देखील आहे.