Join us

न भूतो न भविष्यति! दीपिका पादुकोण-ॲटलीच्या आगामी सिनेमावर रणवीर सिंहची प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2025 11:15 IST

अल्लू अर्जुन आणि दीपिका पादुकोणचा हा साउथ सिनेमा असणार आहे. नुकतंच रणवीर सिंहने या सिनेमाच्या सेटवर भेट दिली.

'जवान' फेम दाक्षिणात्य दिग्दर्शक ॲटलीच्या आगामी सिनेमात दीपिका पादुकोण आणि अल्लू अर्जुन दिसणार आहेत. दीपिका यामध्ये दमदार ॲक्शन सीन्स करणार आहे. काही महिन्यांपूर्वी दीपिकाने सिनेमासंबंधी काही स्केचही शेअर केले होते. तसंच दीपिका आणि अल्लू अर्जुन ही जोडी पहिल्यांदाच पडद्यावर झळकणार आहे. आता या सिनेमाची आणि ॲटलीची रणवीर सिंहने खूप स्तुती केली आहे. त्याने सिनेमाच्या सेटवर हजेरी लावली होती. तेव्हा तो काय म्हणाला बघा.

अल्लू अर्जुन आणि दीपिका पादुकोणचा हा साउथ सिनेमा असणार आहे. नुकतंच रणवीर सिंहने या सिनेमाच्या सेटवर भेट दिली. यानंतर पीटीआयशी बोलताना तो म्हणाला, "मी ॲटलीच्या सिनेमाच्या सेटवर गेलो होतो. दीपिकाचं तिथे शूट सुरु होतं. सिनेमाची स्केल अशी आहे जी याआधी आपण कधीच पाहिली नसेल. न भूतो न भविष्यति असा हा सिनेमा असणार आहे. मी बऱ्याच काळापासून ॲटलीचा चाहता आहे. 'जवान'च्या यशाआधी मी त्याचा 'मर्सल' सिनेमा पाहून प्रभावित झालो होतो. ॲटलीसोबत काम करणं आणि त्याच्या टीमसोबत वेळ घालवणं मला खूप आवडतं."

यावेळी रणवीरने बॉबी देओलचीही स्तुती केली. तो म्हणाला, "बॉबीचं हे पुनर्जागरण युग आहे." तसंच पुढे तो श्रीलीलाबद्दल म्हणाला, "ती तर नॅशनल क्रश आहे. तिच्या आगामी सिनेमांबद्दल मला उत्सुकता आहे. ती मोठी स्टार बनेल."

रणवीर सिंह आगामी 'धुरंधर' सिनेमात दिसणार आहे. सेटवरुन त्याचे अनेक फोटो, व्हिडीओ लीक झाले आहेत. आदित्य धर दिग्दर्शित या सिनेमात रणवीरसोबत तगडी स्टारकास्ट आहे. संजय दत्त, आर माधवन, अक्षय खन्ना, अर्जुन रामपाल असे दिग्गज कलाकार आहेत. ५ डिसेंबर रोजी सिनेमा भेटीला येत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Ranveer Singh praises Deepika-Atlee's film, calls it unprecedented.

Web Summary : Ranveer Singh visited the set of Deepika Padukone and Atlee's upcoming film starring Allu Arjun, calling it an unprecedented cinematic experience. He lauded Atlee's vision and praised the film's scale, also commending Bobby Deol and Sreeleela.
टॅग्स :रणवीर सिंगTollywoodबॉलिवूड