Join us

रजनीकांत यांची लेक सौंदर्याची 'कुली' चित्रपट पाहिल्यानंतर पोस्ट, वडिलांचं केलं कौतुक!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2025 17:22 IST

सौंदर्या हिने खास पोस्ट शेअर करत वडिलांबद्दल अभिमान व्यक्त केला आहे.

भारतीय चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार रजनीकांत (Rajinikanth) यांनी नुकतेच आपल्या अभिनयाच्या प्रवासाला ५० वर्षे पूर्ण केली आहेत. १५ ऑगस्ट १९७५ रोजी त्यांचा पहिला चित्रपट 'अपूर्व रागंगल' (Apoorva Raagangal) प्रदर्शित झाला होता. या ५० वर्षांच्या यशस्वी कारकिर्दीनिमित्त रजनीकांत यांचा 'कुली' चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. लोकेश कनागराज दिग्दर्शित 'कुली' १४ ऑगस्ट रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून बॉक्स ऑफिसवरही तो धडाकेबाज कामगिरी करत आहे. रजनीकांत यांचा चित्रपटसृष्टीतील ५० वर्षांचा प्रवास आणि 'कुली'ला मिळालेलं यश पाहून सौंदर्या हिने खास पोस्ट शेअर करत वडिलांबद्दल अभिमान व्यक्त केला आहे.

सौंदर्याने तिच्या एक्स अकाउंटवर लिहिलं, "५० वर्षे, अप्पा. तुम्ही केवळ सिनेमा इंडस्ट्रीचा भाग नाही आहात, तर त्याला आकार दिला आहे. तुम्ही इंडस्ट्रीला अशा उंचीवर नेले आहे, जिथे तो आधी कधीही पोहोचली नव्हती. तुम्ही पिढ्यांना प्रेरणा दिली आहे. नवे विक्रम स्थापित केले आहेत".

पुढे तिनं लिहलं, मला तुमची मुलगी असल्याचा अभिमान आहे. माझं तुम्हावर अमाप प्रेम करते.  'कुली'च्या शेवटच्या १० मिनिटांचा फ्लॅशबॅक मी पुन्हा पुन्हा पाहीन आणि प्रत्येक वेळी टाळ्या वाजवेन. अप्पा, तुम्ही सर्वोत्तम आहेस. थलाईवर निरंधरम!", या शब्दात तिनं वडिलांवरील प्रेम व्यक्त केलंय. सौंदर्या ही रजनीकांत यांची मोठी मुलगी आहे. ती निर्माती आणि दिग्दर्शिका आहे. 

दरम्यान, 'कुली'च्या कमाईवर नजर टाकल्यास या चित्रपटाने पहिल्याच दिवशी तब्बल ६५ कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता. तर दुसर्‍या दिवशी या चित्रपटाने ५४. ७५ कोटींची कमाई केली आहे. तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने ३९.५ कोटींची कमाई केली आहे. तर चौथ्या दिवशी या चित्रपटाने ३४ कोटींची कमाई केली आहे. अशा प्रकारे या चित्रपटाने भारतात एकूण १९३.२५ कोटींची कमाई केली आहे. विशेष म्हणजे 'कुली'नं संपुर्ण जगभरात ४५.३४ दशलक्ष डॉलर्स म्हणजेच ३९७ कोटींची कमाई केली आहे

टॅग्स :रजनीकांतसेलिब्रिटीबॉलिवूड