Join us
Daily Top 2Weekly Top 5

साखरपुडा झाल्यानंतर मोडलेलं पहिलं लग्न, आता गर्लफ्रेंडसोबत नागार्जुनचा लेक अखिल अक्किनेनीचं शुभमंगल सावधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2025 15:35 IST

दाक्षिणात्य सुपरस्टार नागार्जुन यांचा लेक अखिल अक्किनेनी लग्नाच्या बेडीत अडकला आहे. अखिलने गर्लफ्रेंड झैनब रावदजीसोबत सात फेरे घेत नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. हैदराबादमध्ये पारंपरिक पद्धतीने अखिल आणि झैनब यांचा विवाहसोहळा पार पडला.

दाक्षिणात्य सुपरस्टार नागार्जुन यांचा लेक अखिल अक्किनेनी लग्नाच्या बेडीत अडकला आहे. अखिलने गर्लफ्रेंड झैनब रावदजीसोबत सात फेरे घेत नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. हैदराबादमध्ये पारंपरिक पद्धतीने अखिल आणि झैनब यांचा विवाहसोहळा पार पडला. कुटुंबीय, नातेवाईक आणि मित्रपरिवाराच्या उपस्थितीत त्यांच्या डोक्यावर अक्षता पडल्या. अखिल आणि झैनब यांच्या विवाहसोहळ्याचे फोटो समोर आले आहेत. 

लग्नासाठी अखिल आणि झैनबने पारंपरिक लूक केला होता. अखिलने पांढऱ्या रंगाची धोती आणि कुर्ता परिधान केला होता. तर साडी आणि दागिन्यांमध्ये नववधू झैनब नटली होती. अखिल आणि झैनाब गेल्या दोन वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. त्यानंतर गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात त्यांनी साखरपुडा केला होता. आता लग्नाच्या बेडीत अडकत त्यांनी आयुष्यभर एकत्र राहण्याचा आणि एकमेकांना साथ देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच्या लग्नाला नागा चैतन्यनेही पत्नी शोभिता धुलिपालासह हजेरी लावली होती. 

अखिल हा नागार्जुन आणि त्यांची दुसरी पत्नी अमाला अक्किनेनी यांचा मुलगा आहे. त्याने बालकलाकार म्हणूनच सिनेमांत काम करायला सुरुवात केली होती. सिसिंदरी या नागार्जुन यांच्या सिनेमात तो झळकला होता. एजेंट, मिस्टर मजू, हॅलो, अखिल अशा सिनेमांमध्ये त्याने काम केलं आहे. अखिलने २०१६ मध्ये श्रिया भुपलशी साखरपुडा केला होता. मात्र लग्न होण्याआधीच त्यांचं नातं तुटलं. परंतु आता जवळपास ८ वर्षांनी अखिलने झैनबशी लग्न करत नव्याने आयुष्याला सुरुवात केली आहे. 

टॅग्स :नागार्जुनसेलिब्रेटी वेडिंग