Mrunal Thakur Teaches Marathi To Adivi Sesh : मराठी मुलगी ते स्टार असा प्रवास करणारी अभिनेत्री म्हणजे मृणाल ठाकूर. मुळची महाराष्ट्रातील धुळ्याची असलेल्या मृणालने केवळ अभिनयानेच नव्हे, तर आपल्या संस्कारांनीही प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. आज ती चित्रपटसृष्टीत यशाच्या शिखरावर पोहोचली असली, तरी तिच्यातलं मराठीपण अजूनही तितकंच घट्ट आहे. मराठी, अहिराणी भाषेबद्दलही तिचं विशेष प्रेम आहे. ती अनेकदा मराठीत संवाद साधताना दिसते. आता मृणालनं थेट दाक्षिणात्य सुपरस्टार अदिवी शेषला मराठीचे धडे दिले दिल्याचं पाहायला मिळालं.
मृणालने अदिवी शेष याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये मृणालनं लिहलं, "ऐका हो मुलींनो... नवीन मराठी मुलगा अलर्ट". व्हिडीओमध्ये मृणालनं अभिनेत्याला काही भन्नाट मराठी संवाद बोलायला सांगितले. सुरुवातीला तिने त्याच्याकडून "ए चोमडी इकडे ये... ए कार्टे" हे वाक्य वदवून घेतले. त्यानंतर तिनं आदिवला 'अशी ही बनवाबनवी' सिनेमाचं गाणं तिच्या मागोमाग गायला सांगितलं. ऐवढेच नाही तर "आचाऱ्याची बायको वेडी काय" हा लोकप्रिय डायलॉगही आदिवनं म्हणून दाखवला. दाक्षिणात्य असूनही अदिवीने ज्या सफाईदारपणे मराठी बोलला, ते पाहून चाहते थक्क झाले आहेत. दोघांचा हा मजेशीर व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
कधी प्रदर्शित होणार 'डकैत: ए लव्ह स्टोरी'
दरम्यान, अदिवी शेष आणि मृणाल ठाकूर यांचा 'डकैत: ए लव्ह स्टोरी' (Dacoit: A Love Story) हा चित्रपट १० एप्रिल २०२६ रोजी प्रदर्शित होणार आहे. शनील देव दिग्दर्शित या अॅक्शन-थ्रिलर चित्रपट चित्रपटात अनुराग कश्यप खलनायकाच्या भूमिकेत आहे. शिवाय या चित्रपटात प्रकाश राज, अतुल कुलकर्णी अशा दमदार कलाकारांचा समावेश आहे. अदिवी शेष हा त्याच्या हँन्डसम लूक आणि अभिनयामुळे चाहत्यांचा लाडका आहे. तर मृणालनं हिंदी टेलिव्हिजन, मराठी आणि हिंदी चित्रपटांसह दक्षिणेतही काम केलं आहे.
Web Summary : Mrunal Thakur, a Marathi actress, taught Adivi Sesh Marathi phrases and dialogues from classic films. Adivi's fluent pronunciation surprised fans. Their movie 'Dacoit: A Love Story' releases in 2026.
Web Summary : मराठी अभिनेत्री मृणाल ठाकुर ने अदिवी शेष को मराठी के कुछ वाक्य और संवाद सिखाए। अदिवी का उच्चारण सुनकर प्रशंसक हैरान रह गए। उनकी फिल्म 'डकैत: ए लव स्टोरी' 2026 में रिलीज होगी।