Join us
Daily Top 2Weekly Top 5

अभिनेत्रीला आईसमोरच झालेली कास्टिंग काऊचची मागणी, सांगितलं इंडस्ट्रीतलं भयाण वास्तव

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2026 14:54 IST

कोण आहे ही अभिनेत्री?

तापसी पन्नूच्या 'अस्सी' सिनेमाची सध्या चर्चा आहे या सिनेमात लैंगिक शोषणाच्या शिकार झालेल्या पीडित महिलांचा हृदयद्रावक कहाणी आहे. याविरोधात त्यांचा लढा आणि कायदेशीर न्यायाची गोष्ट यामध्ये दाखवण्यात आली आहे. सिनेमात एका मल्याळम अभिनेत्रीची भूमिका आहे जिने लक्ष वेधून घेतलं आहे. खऱ्या आयुष्यात तिने कास्टिंग काऊचचा अनेकदा सामना केल्याचा खुलासा केला आहे. कोण आहे ती?

मल्याळम चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री कनी कुश्रुतिने तिच्या करिअरच्या सुरुवातीच्या काळात 'कास्टिंग काऊच'चा सामना केला होता. तिने एका मुलाखतीत उघडपणे सांगितले होते की, मल्याळम इंडस्ट्रीत काम करत असताना तिला अनेकदा तडजोड करण्यासाठी विचारलं गेलं होतं.. या प्रकाराला ती इतकी कंटाळली होती की, तिने चित्रपटसृष्टी सोडून पुन्हा नाटकांकडे वळण्याचा निर्णय घेतला होता.

या अनुभवातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, काही निर्मात्यांनी आणि दिग्दर्शकांनी थेट तिच्या आईला गाठून ही मागणी केली होती. कनीच्या आईला सांगण्यात आले की, जर तिच्या मुलीला चित्रपटात मोठी भूमिका हवी असेल, तर तिने निर्मात्यांशी तडजोड करावी लागेल. या मानसिक त्रासामुळे आणि फिल्म इंडस्ट्रीतील अशा दूषित वातावरणामुळे कनीने अनेक वर्ष चित्रपटांपासून अंतर राखले होते.

अखेर आर्थिक अडचणींमुळे आणि घर चालवण्यासाठी कनीला पुन्हा एकदा मोठ्या पडद्याकडे वळावे लागले. मात्र, #MeToo चळवळ आणि चित्रपटसृष्टीतील महिला संघटनांच्या (WCC) कामामुळे आता परिस्थिती हळूहळू बदलत असल्याचे मत तिने व्यक्त केले आहे. योगायोगाने, आता ती तापसी पन्नूच्या 'अस्सी' चित्रपटात लैंगिक शोषणाविरुद्ध लढणाऱ्या एका 'सर्व्हायव्हर'ची भूमिका साकारत आहे ज्यामुळे तिचा हा जुना संघर्ष पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Actress faced casting couch demands in front of her mother.

Web Summary : Malayalam actress Kani Kusruti revealed facing casting couch demands early in her career. Producers even approached her mother with compromising offers. Financial struggles forced her return to cinema, where she now portrays a sexual assault survivor.
टॅग्स :सेलिब्रिटीTollywoodकास्टिंग काऊच