Join us
Daily Top 2Weekly Top 5

'द फॅमिली मॅन २'च्या 'चेल्लम सरांचा नवा चित्रपट येतोय, जाणून घ्या कुठे आणि कधी पाहता येणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2026 09:56 IST

'द फॅमिली मॅन' या वेब सीरिजमधील 'चेल्लम सर' या भूमिकेतून घराघरात पोहोचलेले अभिनेते आणि दिग्दर्शक उदय महेश आता एका ...

'द फॅमिली मॅन' या वेब सीरिजमधील 'चेल्लम सर' या भूमिकेतून घराघरात पोहोचलेले अभिनेते आणि दिग्दर्शक उदय महेश आता एका नव्या चित्रपटासह प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. त्यांचा तमिळ चित्रपट 'लकी द सुपरस्टार' सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. हा चित्रपट थेट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाला आहे.

जिओ हॉटस्टारने आपल्या आगामी साऊथ इंडियन चित्रपटांची यादी नुकतीच जाहीर केली आहे. 'लकी द सुपरस्टार' हा चित्रपट चित्रपटगृहांऐवजी थेट २० फेब्रुवारी २०२६ रोजी जिओ हॉटस्टारवर प्रदर्शित होईल. विशेष म्हणजे, हा चित्रपट तमिळसोबतच हिंदी आणि इतर प्रादेशिक भाषांमध्येही उपलब्ध असणार आहे.

काय आहे 'लकी'ची कथा?हा चित्रपट एका गोंडस कुत्र्याभोवती (Puppy) फिरतो, ज्याचं नाव 'लकी' आहे. लकी हा साधा कुत्रा नसून त्याच्याकडे एक विलक्षण शक्ती आहे, ज्यामुळे ज्याच्याकडे तो असेल त्याच्या आयुष्यात सौभाग्य आणि आनंद येतो. चित्रपटात काही भ्रष्ट राजकारणी स्वतःच्या स्वार्थासाठी या कुत्र्याचा वापर करण्याचा प्रयत्न करतात आणि त्याला पळवून नेतात. एका लहान मुलीला हे कुत्रं भेट म्हणून मिळतं, पण ते हरवल्यानंतर तिची होणारी अवस्था आणि त्यानंतर अभिनेता जीव्ही प्रकाश या पिल्लाला वाचवण्यासाठी कसा संघर्ष करतो, हे या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.

तगडी स्टारकास्टया चित्रपटात प्रसिद्ध संगीतकार आणि अभिनेता जीव्ही प्रकाश आणि अनस्वरा राजन मुख्य भूमिकेत आहेत. त्यांच्यासोबतच देवदर्शिनी, कोवई सरला, सुब्बू पंचू, मोट्टा राजेंद्रन आणि डॅनियल अ‍ॅनी पोप यांसारख्या तमिळ सिनेसृष्टीतील दिग्गज कलाकारांची फौज पाहायला मिळणार आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : 'The Family Man 2' Fame Chellam Sir's New Movie Release Date!

Web Summary : Uday Mahesh, famed as Chellam Sir, stars in 'Lucky The Superstar,' releasing February 20, 2026, on Jio Hotstar. The movie revolves around a special puppy and a girl, battling corrupt politicians. It will be available in multiple languages.
टॅग्स :सिनेमा