Join us

'जवान'च्या म्युझिक कंपोजरसोबत किर्ती सुरेश बांधणार लग्नगाठ?, अभिनेत्री खुलासा करत म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2023 09:15 IST

Keerthy Suresh: साऊथ सिनेसृष्टीतील सुपरस्टार अभिनेत्री किर्ती सुरेश गेल्या अनेक दिवसांपासून तिच्या लग्नाबाबत चर्चेत आहे.

साऊथ सिनेसृष्टीतील सुपरस्टार अभिनेत्री किर्ती सुरेश (Keerthy Suresh) गेल्या अनेक दिवसांपासून तिच्या लग्नाबाबत चर्चेत आहे. अभिनेत्री 'जवान' फेम संगीत दिग्दर्शक अनिरुद्ध रविचंदरसोबत लग्न करणार असल्याचे वृत्त समोर आले होते. मात्र आता अभिनेत्रीने या बातम्यांवर मौन सोडत मोठा खुलासा केला आहे.

वास्तविक, गेल्या अनेक दिवसांपासून ग्लॅमरस दुनियेत अफवा पसरत होत्या की किर्ती सुरेश लवकरच लग्न करणार आहे. पण आता टाईम्स नाऊच्या वृत्तानुसार, क्रिती सुरेशने या अफवांचे खंडन केले आहे. याबद्दल बोलताना अभिनेत्री म्हणाली, "ही बातमी पूर्णपणे चुकीची आहे, अनिरुद्ध फक्त माझा मित्र आहे..."

अभिनेत्रीच्या लग्नाच्या चर्चेवर वडील म्हणाले...यावर किर्तीशिवाय तिच्या वडिलांनीही प्रतिक्रिया दिली आहे. ओटीटी प्लेशी बोलताना ते म्हणाले, "यात अजिबात तथ्य नाही. या सर्व बातम्या कोणत्याही सत्याशिवाय निराधार आहेत आणि हे कोणीतरी पहिल्यांदाच करत नाहीये.

किर्ती अनिरुद्धच्या गाण्यावर दिसली थिरकतानाकिर्ती सुरेश अलीकडेच 'जवान' मधील 'चलेया' गाण्यावर डान्स करताना दिसला होती. अनिरुद्ध रविचंदर यांनी संगीतबद्ध केले आहे. गाण्यात ती अॅटलीची पत्नी प्रियासोबत डान्स करत होती. हे शेअर करत कीर्तीने लिहिले, "फक्त मनोरंजनासाठी! शेवट चुकवू नका.."

किर्ती आणि अनिरुद्ध यांनी या चित्रपटांमध्ये एकत्र काम केले होतेकिर्ती सुरेश आणि अनिरुद्ध रविचंदर यांनी 'रेमो', 'थाना सेरांधा कूटम', 'अग्न्यथवासी' यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. त्यामुळे याआधीही त्यांच्या लग्नाची बातमी समोर आली आहे. त्याशिवाय दोघेही सोशल मीडियावर एकमेकांचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असतात. 

टॅग्स :जवान चित्रपट