Join us  

'टॉक्सिक' सिनेमात KGF स्टार यशच्या बहिणीची भूमिका साकारणार 'ही' बॉलिवूड अभिनेत्री!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2024 11:24 AM

यश 'टॉक्सिक' सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे.

साऊथ सुपरस्टार यश कायमच चर्चेत असतो.  यशच्या चाहत्यांची संख्यादेखील फार मोठी आहे. चाहते देखील यश याच्या आगामी सिनेमाच्या प्रतीक्षेत आहेत. आता लवकरच यश 'टॉक्सिक' सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे.  साऊथ आणि नॉर्थ इंडस्ट्रीतील स्टार्सही या चित्रपटात दिसणार आहेत. या सिनेमात यश याच्यासोबत बॉलिवूडच्या दोन लोकप्रिय अभिनेत्री झळकणार असल्याची चर्चा रंगली आहे.   'टॉक्सिक' सिनेमाबद्दल बातमी आली होती की या चित्रपटात यशसोबत एक बॉलिवूड अभिनेत्री मुख्य भूमिकेत दिसणार आहे. ती अभिनेत्री या चित्रपटात यशच्या बहिणीची भूमिका साकारणार आहे. टाईम्स नाऊच्या रिपोर्टनुसार, करीना कपूरने 'टॉक्सिक'मध्ये एन्ट्री घेतली आहे. ताज्या अपडेटनुसार, बेबो 'टॉक्सिक'मध्ये यशच्या बहिणीची भूमिका साकारणार आहे. 'टॉक्सिक' सिनेमाची कथा भाऊ आणि बहिणीच्या नात्याभोवती फिरणार आहे. ज्यांना वेगळे करणं अशक्य आहे.

तर करीना कपूरसोबत या सिनेमात कियारा आडवाणीदेखील असणार आहे.  यश आणि कियारा सिनेमात रोमान्स करताना दिसणार आहेत. 'टॉक्सिक' सिनेमाचे दिग्दर्शन गीतू मोहनदास करत आहेत. सिनेमाच्या रिलीजबद्दल बोलायचं झालं तर यशच्या चाहत्यांना काही काळ वाट पाहावी लागणार आहे. 'टॉक्सिक' हा 10 एप्रिल 2025 रोजी रिलीज होईल. रॉकिंग स्टारसोबत टॉक्सिकमध्ये नवाजुद्दीन सिद्दीकी आणि सई पल्लवी यांच्याही भूमिका असल्याचं म्हटलं जात आहे. केव्हीएन प्रोडक्शनच्या बॅनरखाली या चित्रपटाची निर्मिती होत आहे.

टॅग्स :यशकरिश्मा कपूरकियारा अडवाणीसेलिब्रिटीसिनेमाTollywoodबॉलिवूड