साउथचा सुपरस्टार ऋषभ शेट्टीच्या 'कांतारा चॅप्टर १' (Kantara Chapter 1) चा बॉक्स ऑफिसवरचा जलवा आजही कायम आहे. रिलीज झाल्यापासून हा चित्रपट जोरदार कमाई करत आहे. नुकताच 'कांतारा चॅप्टर १'ने देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर ५०० कोटी रुपयांचा टप्पा पार केला आहे, जो स्वतःमध्येच एक मोठा विक्रम आहे. आता ही कलाकृती भारतात ६०० कोटींच्या क्लबकडे वेगाने वाटचाल करत आहे. ऋषभ शेट्टीच्या या चित्रपटाने आतापर्यंत देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर किती कोटींचा व्यवसाय केला आहे, हे जाणून घेऊया.
'कांतारा चॅप्टर १' रिलीज होऊन दोन आठवड्यांपेक्षा जास्त कालावधी झाला आहे आणि देशभरातील प्रेक्षक हा चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटगृहांकडे धाव घेत आहेत. पहिल्या आठवड्यात चित्रपटाने ३३७.४ कोटी रुपयांचा व्यवसाय केला. दुसऱ्या आठवड्यात १४७.८५ कोटी रुपयांची कमाई झाली. १६ व्या दिवशी कमाईत थोडी घट झाली, तरी चित्रपटाने ८.५० कोटी रुपयांचा गल्ला जमवला. १७ व्या दिवशी 'कांतारा चॅप्टर १'ने १२.९ कोटी रुपये कमावले.
५०० कोटींहून अधिक कलेक्शनट्रेड वेबसाइट 'सॅकनिल्क'च्या सुरुवातीच्या रिपोर्ट्सनुसार, 'कांतारा चॅप्टर १'ने १८ व्या दिवशी म्हणजेच तिसऱ्या रविवारी १७.५० कोटी रुपयांचे कलेक्शन केले. अशा प्रकारे ऋषभ शेट्टीच्या या चित्रपटाने आतापर्यंत देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर एकूण ५२४.१५ कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे. ज्या वेगाने हा चित्रपट कमाई करत आहे, त्यावरून हे स्पष्ट होते की, तो लवकरच भारतीय बॉक्स ऑफिसवर ६०० कोटींचा आकडा पार करेल.
दिवस : भारतातील कमाई (कोटी रुपयांमध्ये)
पहिला दिवस : ६१.८५ कोटीदुसरा दिवस : ४५.४० कोटी तिसरा दिवस : ५५.०० कोटी चौथा दिवस : ६३.०० कोटीपाचवा दिवस : ३१.५० कोटीसहावा दिवस : ३४.२५ कोटी सातवा दिवस : २५.२५ कोटीआठवा दिवस : २१.१५ कोटीनववा दिवस : २२.२५ कोटीदहावा दिवस : ३९.०० कोटीअकरावा दिवस : ३९.७५ कोटी बारावा दिवस : १३.३५ कोटी तेरावा दिवस : १४.१५ कोटीचौदावा दिवस : १०.५० कोटीपंधरावा दिवस : ८.८५ कोटीसोळावा दिवस : ८.५० कोटीसतरावा दिवस : १२.९० कोटीअठरावा दिवस : १७.५० कोटीएकूण : ५२४.१५ कोटी
ऋषभ शेट्टीने केलं दिग्दर्शन'कांतारा चॅप्टर १' हा चित्रपट होम्बळे फिल्म्सच्या बॅनरखाली बनला आहे. ऋषभ शेट्टीने केवळ यात अभिनयच केला नाही, तर त्यानेच या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन देखील केले आहे. हा चित्रपट २०२२ च्या ब्लॉकबस्टर 'कांतारा: अ लिजेंड'चा प्रीक्वल आहे. 'कांतारा चॅप्टर १' मध्ये रुक्मिणी वसंत, जयराम आणि गुलशन देवैया यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.
'कांतारा चॅप्टर १'ची कथाजेव्हा मानवी लालसा आणि सत्तेचा धोका निसर्ग आणि श्रद्धेवर येतो, तेव्हा दैवी शक्ती कशा प्रकारे त्यांचे रक्षण करतात, हे हा चित्रपट दाखवतो. 'कांतारा चॅप्टर १'ला त्याच्या उत्कृष्ट व्हिज्युअल्स, दमदार अभिनय आणि कथेसाठी खूप प्रशंसा मिळाली आहे. साउथ सिनेसृष्टीपासून ते बॉलिवूडपर्यंतच्या अनेक कलाकारांनी या चित्रपटाचे कौतुक केले आहे.
Web Summary : Rishab Shetty's 'Kantara Chapter 1' continues its box office triumph, crossing ₹500 crore domestically. The film is rapidly approaching ₹600 crore, driven by strong audience reception and positive reviews for its visuals and story.
Web Summary : ऋषभ शेट्टी की 'कांतारा चैप्टर 1' बॉक्स ऑफिस पर धमाल मचा रही है, जिसने घरेलू बॉक्स ऑफिस पर ₹500 करोड़ का आंकड़ा पार कर लिया है। फिल्म तेजी से ₹600 करोड़ की ओर बढ़ रही है, जिसे दर्शकों से जबर्दस्त प्रतिक्रिया मिल रही है।