Join us

नवीन कथेसह दाखल झाला 'कांतारा २'चा टीझर, शिव रुपात दिसला ऋषभ शेट्टी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2024 09:09 IST

'Kantara 2' Teaser : 'कांतारा २'ची रिलीज डेट घोषित केल्यानंतर काही तासांनंतर, 'कांतारा २'च्या निर्मात्यांनी त्याचा पहिला टीझर देखील प्रदर्शित केला आहे.

'कांतारा २'ची (Kantara 2) रिलीज डेट घोषित केल्यानंतर काही तासांनंतर, 'कांतारा २'च्या निर्मात्यांनी त्याचा पहिला टीझर देखील प्रदर्शित केला आहे. ज्यामुळे २०२२च्या चित्रपटाचा प्रीक्वल आणखी भयावह वाटत आहे. 'कांतारा अ लिजेंड चॅप्टर १' या शीर्षकासह, ८२ सेकंदाचा प्रोमो व्हिडिओ चाहत्यांसाठी थोडा छोटा आहे पण तो छान आहे. तसेच, हे ऋषभ शेट्टी(Rishabh Shetty)च्या २०२२ साली रिलीज झालेल्या चित्रपटाच्या कथेच्या आधीची कथा यात सांगितली आहे.

टीझरची सुरुवात 'क्षण आला आहे. दैवी जंगल कुजबुजते आहे.' काळ्या पडद्यावर काहीतरी जळताना दिसत आहे. पार्श्वभूमीत, अस्पष्ट चित्रात शिवा (ऋषभ शेट्टी) टॉर्च घेऊन जंगलातून चालताना दिसत आहे. त्याला अग्नीने वेढले असताना, एक आवाज ऐकू येतो, 'प्रकाश! प्रकाशात सर्व काही दिसते! पण हा प्रकाश नाही! ती एक दृष्टी आहे! काल काय होते, काय आहे आणि काय असेल हे दाखवणारी दृष्टी! तुला दिसत नाही का?' अंधारात शिवाचा चेहरा समोर येतो. कदंब राजवटीच्या काळात ही कथा घडल्याचेही टीझरमध्ये दिसून आले आहे. गुहेत पौर्णिमा दिसत असताना रक्ताने माखलेला माणूस त्रिशूळसोबत दिसतो. गळ्यात रुद्राक्ष आणि लांब केसांसह ऋषभ अप्रतिम दिसत आहे. जेव्हा त्याचा चेहरा शेवटी प्रकट होतो, तेव्हा आपल्याला त्याच्या डोळ्यांत चमकणाऱ्या आगीचे निखारे दिसतात.

'कांतारा २' रिलीज डेट२०२२ साली प्रदर्शित झालेला ऋषभ शेट्टी लिखित आणि दिग्दर्शित कांतारा चित्रपटासाठी त्याला स्वतःला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. 'कांतारा अ लिजेंड चॅप्टर १' २ ऑक्टोबर २०२५ रोजी गांधी जयंतीच्या दिवशी रुपेरी पडद्यावर येईल. होंबळे फिल्म्सच्या बॅनरखाली विजय किरगांडूर निर्मित, कांतारा २ कन्नड, तमिळ, तेलगू, मल्याळम, हिंदी, बंगाली आणि इंग्रजी भाषेत प्रदर्शित होणार आहे. प्रोमो व्हिडिओ शेअर करताना प्रोडक्शन हाऊसने सोशल मीडियावर लिहिले, की 'भूतकाळातील प्रतिध्वनींमध्ये पाऊल टाका.'