Join us
Daily Top 2Weekly Top 5

लोकप्रिय अभिनेता अडकला विवाहबंधनात, 'इंटिरियर डिझायनर'सोबत नव्या आयुष्याची सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2026 11:23 IST

सिनेविश्वात सध्या लग्नाचे वारे वाहत असून, अनेक कलाकार विवाहबंधनात अडकत आहेत.

सिनेविश्वात सध्या लग्नाचे वारे वाहत असून, अनेक कलाकार विवाहबंधनात अडकत आहेत. नुकतंच 'फिजिक्स टीचर' आणि 'मनदा कडुला' सारख्या चित्रपटांतून घराघरात पोहोचलेला लोकप्रिय कन्नड अभिनेता सुमुख (Sumukh) याने आपल्या आयुष्याची नवी इनिंग सुरू केली आहे. सुमुखने गर्लफ्रेंड मैत्री उका हिच्याशी ऋषिकेशमध्ये अत्यंत खाजगी सोहळ्यात लग्नगाठ बांधली. गंगा नदीच्या विलोभनीय तीरावर आध्यात्मिक वातावरणात हा विवाह सोहळा पार पडला. याचे फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

सुमुख आणि मैत्री हे दोघे गेल्या ७ वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. इंडस्ट्रीत असूनही सुमुखने आपले वैयक्तिक आयुष्य नेहमीच खाजगी ठेवले होते. सुख-दुःखाच्या प्रत्येक काळात एकमेकांना खंबीर साथ दिल्यानंतर आता या 'पाॅवर कपल'ने अखेर लग्नाचा निर्णय घेतला. ऋषिकेशमधील एका रिसॉर्टवर केवळ जवळचे मित्र आणि कुटुंबीयांच्या उपस्थितीत त्यांचा लग्न सोहळा पार पडला. लग्नासाठी या जोडप्याने आयव्हरी रंगाच्या पोशाखात 'ट्विनिंग' केले होते. मैत्री हिने प्रसिद्ध डिझायनर सब्यसाचीनं डिझाइन केलेला सुंदर लेहेंगा परिधान केला होता. ज्यावर तिने स्टेटमेंट ज्वेलरी आणि चोकर घालून आपला लूक पूर्ण केला. तर सुमुखनेही त्याच रंगाची शेरवानी परिधान करून सर्वांचे लक्ष वेधले.

कोण आहे सुमुखची पत्नी मैत्री उका?

सुमुखची पत्नी मैत्री उका ही ग्लॅमर जगतापासून दूर आहे. पण, ती एक नामांकित आर्किटेक्ट आणि प्रसिद्ध इंटिरियर डिझायनर आहे. मूळची मुंबईची असलेल्या मैत्रीने अनेक दिग्गज कंपन्यांसोबत काम केले आहे. सोशल मीडियावर ती फारशी सक्रिय नसते, मात्र तिच्या सौंदर्याने सध्या चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

ज्येष्ठ रंगभूमी कलाकार शशी कुमार आणि नंदिता यादव यांचा मुलगा असलेल्या सुमुखला इंडस्ट्रीत पाय रोवण्यासाठी तब्बल १० वर्षे लागली. 'फिजिक्स टीचर' आणि 'याना' यांसारख्या चित्रपटांनंतर 'मनदा कडुला' या चित्रपटाने त्याला राष्ट्रीय स्तरावर ओळख मिळवून दिली. अभिनयाचे धडे गिरवण्यासाठी तो मुंबईतही वास्तव्यास होता. आता त्याच्या लग्नानंतर दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सहकलाकार आणि चाहते त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Kannada actor Sumukh marries interior designer Maithri in Rishikesh.

Web Summary : Kannada actor Sumukh, known for 'Physics Teacher,' married Maithri Uka in Rishikesh. The couple, dating for seven years, had a private ceremony with family. Maithri is a Mumbai-based architect and interior designer. Sumukh's career took off after 'Manada Kadula'.
टॅग्स :सेलिब्रिटीलग्न