Join us

नागा चैतन्य करणार दुसरं लग्न? समांथापासून विभक्त झाल्यानंतर 2 वर्षांनी पुन्हा बोहल्यावर चढणार असल्याच्या चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2023 17:08 IST

समांथा प्रभूबरोबरच्या घटस्फोटानंतर दोन वर्षांनी नागा चैतन्य करणार दुसरं लग्न?

नागा चैतन्य आणि समांथा रुथ प्रभू ही दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय जोडी होती. त्यांच्याकडे आदर्श कपल म्हणून पाहिलं जायचं. परंतु, २०२१मध्ये घटस्फोट घेत ते एकमेकांपासून वेगळे झाले. त्यांच्या घटस्फोटाने चाहत्यांनाही धक्का बसला होता. घटस्फोटानंतर नागा चैतन्य आणि समांथा एकत्र दिसले नाहीत. मध्यंतरी नागाचैतन्य प्रसिद्ध अभिनेत्रीला डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. आता नागाचैतन्य दुसरं लग्न करणार असल्याच्या चर्चा आहेत. समांथापासून वेगळं झाल्यानंतर दोन वर्षांनी नागाचैतन्या पुन्हा बोहल्यावर चढणार असल्याचं बोललं जात आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, नागाचैतन्य दुसऱ्यांदा लग्न करणार आहे. नागाचैतन्य हा सुप्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेता नागार्जुन यांचा मुलगा आहे. नागार्जुन आपल्या लेकाचं दुसरं लग्न लावून देण्याच्या तयारीत आहेत. न्यूज १८ने दिलेल्या वृत्तानुसार, नागार्जुन यांची होणारी सून ही एका व्यावसायिकाची मुलगी असून तिचा सिनेसृष्टीशी काहीही संबंध नाही. पण, अद्याप याबाबत नागाचैतन्य किंवा त्याच्या कुटुंबीयांकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

नागा चैतन्य आणि समांथाने २०१७ साली लग्नगाठ बांधली होती. एका चित्रपटाच्या सेटवर त्यांच्यातील प्रेम बहरलं होतं. परंतु, लग्नानंतर अवघ्या चारच वर्षांत घटस्फोट घेत ते वेगळे झाले. समांथाला घटस्फोट दिल्यानंतर नागाचैतन्यचं नाव अभिनेत्री शोबिता धुलिपालाबरोबर जोडलं गेलं होतं. त्यांना एकत्र स्पॉटही करण्यात आलं होतं. त्यांचे फोटोही व्हायरल झाले होते. ते दोघे डेट करत असल्याच्या चर्चाही रंगल्या होत्या. परंतु, त्या दोघांनीही नात्याबाबत कोणतीही स्पष्टता दिली नव्हती.

टॅग्स :समांथा अक्कीनेनीनागार्जुन