Join us
Daily Top 2Weekly Top 5

राम चरण - जान्हवी कपूरच्या आगामी शूटींगला सुरुवात, ए.आर.रेहमान यांची उपस्थिती, पाहा फोटोज

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2024 19:11 IST

राम चरणच्या - जान्हवी कपूरच्या आगामी सिनेमाच्या शुटींगला सुरुवात झाली आहे. त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत

राम चरण सध्या चांगलाच चर्चेत आहे. तो सध्या त्याच्या 'गेम चेंजर' सिनेमाच्या शुटींगमध्ये व्यस्त आहे. अशातच राम चरणच्या आगामी सिनेमाच्या शुटींगला सुरुवात झाली. या सिनेमात राम चरण सोबत बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर सुद्धा झळकणार आहे. सध्या 'RC16' असं नाव असलेल्या सिनेमाच्या शुटींगला सुरुवात झाली असून कलाकारांच्या साध्या पोशाखाने सर्वांचं मन जिंकलंय.

'RC16' सिनेमाच्या खास इव्हेंटला राम चरणची पत्नी उपासना आणि त्याचं संपूर्ण कुटुंबिय सहभागी होतं. याशिवाय या सिनेमाचा संगीत ए.आर.रहमान यांच्या विशेष उपस्थितीने सोहळ्याला चार चॉंद लागले. सिनेमाच्या टीमने सेटवर खास पुजेचं आयोजन केलं होतं. राम चरण पारंपरिक धोती - कुर्ता परिधान करुन आला होता तर जान्हवीने सुद्धा हिरव्या रंगाची साडी नेसली होती. दोघांच्या साध्या पोशाखाने सर्वांची मनं जिंकली.

बुच्ची बाबू सिनेमाचं दिग्दर्शन करत असून 'RC16' सिनेमाचा फर्स्ट लूक राम चरणच्या वाढदिवशी म्हणजेच २७ मार्चला भेटीला येण्याची शक्यता आहे. याशिवाय 'RC16' च्या अधिकृत टायटलची सुद्धा घोषणा होईल. 'RC16' सिनेमाच्या माध्यमातून राम चरण आणि जान्हवी कपूर पहिल्यांदाच  मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहेत.

 

टॅग्स :राम चरण तेजाजान्हवी कपूरए. आर. रहमान