Join us

"मी एका मोठ्या सिनेमात फेल झालो", फहाद फाजिलने पुन्हा 'पुष्पा'वर केलं भाष्य; पुढे म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2025 09:04 IST

'पुष्पा' आणि 'पुष्पा २'मध्ये खलनायक असलेल्या फहाद फाजिलने पुन्हा व्यक्त केली नाराजी

अल्लू अर्जुनच्या गाजलेल्या 'पुष्पा' (Pushpa) आणि 'पुष्पा २' (Pushpa 2) मध्ये अभिनेता फहाद फाजिलने (Fahadh Faasil)खलनायकाचं काम केलं. 'पुष्पा २'च्या रिलीजपूर्वी प्रमोशनवेळी फहाद फाजिल मात्र कुठेच दिसला नाही. सिनेमातील भूमिकेवर तो नाराज असल्याची चर्चा झाली. 'पुष्पा २'पाहिल्यानंतरही अनेक प्रेक्षकांनी फहाद फाजिलसारख्या चांगल्या कलाकाराला वाया घालवलं अशी प्रतिक्रिया दिली. फहादसमोर नुकतंच 'पुष्पा'चा विषय काढण्यात आला तेव्हा तो काय म्हणाला वाचा.

'द हॉलिवूड रिपोर्ट इंडिया'शी बोलताना फहाद फाजिलने आपल्या करिअरमधील अनेक सिनेमांवर भाष्य केलं. याचवेळी नाव न घेता तो म्हणाला, "मला कोणालाच दोष द्यायचा नाही. मात्र गेल्या एक वर्षात मी एका मोठ्या सिनेमाबाबतीत फेल झालो. म्हणूनच मला त्या सिनेमाविषयी काहीच बोलायचं नाही. जेव्हा कोणती गोष्ट आपल्या नियंत्रणात नसते तेव्हा ती सोडून दिलेलीच बरी."

फहादने सिनेमाचं नाव घेतलं नसलं तरी चाहत्यांनी हा 'पुष्पा'सिनेमाच आहे हे ओळखलं. याआधीही एका मुलाखतीत फहाद फाजिलने थेट 'पुष्पा' सिनेमावर भाष्य करत म्हटलं होतं की,'पुष्पा सिनेमाने माझ्या करिअरमध्ये काही खास योगदान दिलेलं नाही. ना या सिनेमाने मला पॅन इंडिया स्टार बनवलं आणि ना ही माझ्या अभिनय कौशल्यात वाढ केली.' ही गोष्ट त्याने थेट दिग्दर्शक सुकुमार यांना सांगितली होती.

टॅग्स :सेलिब्रिटीपुष्पाTollywoodअल्लू अर्जुन