Join us
Daily Top 2Weekly Top 5

'बाहुबली' फेम अभिनेता प्रभास लवकरच बांधणार लग्नगाठ?, जवळच्या व्यक्तीने दिली हिंट

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2024 17:50 IST

Prabhas : प्रभासचे चाहते त्याच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहत आहेत. त्याच्या लग्नाच्या बातम्या अनेकदा येत असतात. आता त्याच्या जवळच्या व्यक्तीने आनंदाची बातमी दिली आहे.

साउथ सिनेइंडस्ट्रीतील स्टार प्रभास (Prabhas) प्रोफेशनल लाइफशिवाय खासगी आयुष्यामुळे चर्चेत येत असतो. त्याचे चाहते त्यांच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहत आहेत. कधी त्याचे नाव अनुष्का शेट्टी सोबत जोडले गेले तर कधी क्रिती सनॉनसोबत. दरम्यान आता प्रभासचे काका आणि दिग्गज अभिनेते कृष्णन राजू यांची पत्नी श्यामला देवी यांनी त्यांच्या लग्नाबाबत संकेत दिले आहेत. त्यांच्या लग्नाचे संकेत मिळताच चाहते चांगलेच उत्सुक झाले आहेत.

विजयवाडा येथील कनक दुर्गा मंदिराच्या भेटीदरम्यान, प्रभासच्या काकीने मीडियाशी संवाद साधला आणि त्यांच्या लग्नाबद्दल खुलासा केला. १२३ तेलुगुच्या रिपोर्टनुसार, त्यांनी सांगितले की, प्रभासच्या लग्नाच्या घोषणेची प्रतीक्षा आता संपणार आहे. लवकरच लग्नाची घोषणा होणार आहे. मात्र, जेव्हा श्यामला देवी यांना प्रभासच्या भावी पत्नीबद्दल विचारण्यात आले तेव्हा त्यांनी यावर मौन बाळगले.

प्रभासच्या लग्नाची चाहत्यांना उत्सुकताआता चाहते सोशल मीडियावर प्रभासच्या लग्नाच्या घोषणेची वाट पाहत आहेत. सोशल मीडियावर पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. याआधी श्यामला देवी म्हणाल्या होत्या की, संपूर्ण कुटुंबाला प्रभासने लग्न करावे असे वाटते. मात्र, योग्य वेळ आल्यावर ते होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यापूर्वी प्रभासने लग्नावर सोडलं होतं मौनप्रभासच्या लग्नाबाबत चर्चा होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. हैदराबादमध्ये कल्की 2898 एडी कार्यक्रमादरम्यान प्रभासने अशा अफवांवर प्रतिक्रिया दिली होती. तो म्हणाला होता की, 'मी लवकरच लग्न करणार नाही कारण मला माझ्या महिला चाहत्यांच्या भावना दुखावायच्या नाहीत.

वर्कफ्रंटवर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर प्रभासचा कल्की 2898 एडी काही काळापूर्वी रिलीज झाला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर खळबळ उडवून दिली. या चित्रपटाने अनेक विक्रम आपल्या नावावर केले होते.

टॅग्स :प्रभासबाहुबली