Allu Arjun Raaka First Look Out: 'पुष्पा २' च्या ऐतिहासिक यशानंतर अल्लू अर्जुन (Allu Arjun) पुन्हा एकदा बॉक्स ऑफिस गाजवण्यासाठी सज्ज झाला आहे. आज अभिनेत्यानं त्याच्या वाढदिवसाच्या निमित्तानं चाहत्यांना सर्वात मोठं सरप्राईज दिलं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या दिग्दर्शक ॲटली (Atlee) याच्यासोबतच्या 'AA26' म्हणून चर्चेत असलेल्या चित्रपटाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. या चित्रपटाचे नाव 'राका' (RAKA) असे असून, यामध्ये अल्लू अर्जुनसोबत बॉलिवूड सुंदरी दीपिका पादुकोण (Deepika Padukone) मुख्य भूमिकेत झळकणार आहे.
अल्लू अर्जुनने सोशल मीडियावर 'राका' चित्रपटाचे फर्स्ट लूक पोस्टर शेअर केले आहे. यामध्ये तो टक्कल असलेल्या लूकसह एका वेगळ्याच अवतारात दिसत आहे. पोस्टरमधील अल्लू अर्जुनचा हा रहस्यमय लूक पाहून हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर नवा इतिहास रचणार, याची खात्री चाहत्यांना पटली आहे.
'राका' या चित्रपटाच्या निमित्तानं 'जवान'सारखा ब्लॉकबस्टर चित्रपट देणारा दिग्दर्शक ॲटली आणि जागतिक स्तरावर लोकप्रिय असलेला अल्लू अर्जुन पहिल्यांदाच एकत्र आले आहेत. हा चित्रपट अत्यंत भव्य स्तरावर तयार केला जात असून, तो पॅन इंडिया प्रदर्शित होईल. या चित्रपटाचे आणखी एक मोठे आकर्षण म्हणजे दीपिका पादुकोण. अल्लू अर्जुन आणि दीपिका पहिल्यांदाच पडद्यावर एकत्र दिसणार आहेत.
Web Summary : Allu Arjun's birthday brings a surprise: 'Raaka,' directed by Atlee, is officially announced. The film stars Deepika Padukone alongside Allu Arjun, who sports a unique look in the first poster. This pan-Indian project marks their first collaboration.
Web Summary : अल्लू अर्जुन के जन्मदिन पर धमाका: एटली द्वारा निर्देशित 'राका' की आधिकारिक घोषणा। फिल्म में दीपिका पादुकोण अल्लू अर्जुन के साथ मुख्य भूमिका में हैं, जो फर्स्ट लुक पोस्टर में अलग अंदाज में दिख रहे हैं। यह पैन-इंडिया प्रोजेक्ट उनकी पहली फिल्म है।