Join us
Daily Top 2Weekly Top 5

अल्लू अर्जून वादात, सेटवर कसा वागतो? आता को-स्टारकडून खुलासा, म्हणाला "तो माणूस..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2026 18:48 IST

अभिनेता अल्लू अर्जुन सध्या चर्चेत आला आहे.

दाक्षिणात्य सुपरस्टार आणि नॅशनल अवॉर्ड विजेता अभिनेता अल्लू अर्जुन सध्या चर्चेत आला आहे. ब्रँड मॅनेजर कावेरी बरुआ यांनी एका पॉडकास्टमध्ये अल्लू अर्जुन आणि त्याच्या टीमबद्दल धक्कादायक दावे केले आहेत. मात्र, हे दावे फेटाळून लावत अल्लूच्या टीमने आता कायदेशीर कारवाईचा ईशारा दिला आहे. याच दरम्यान 'पुष्पा' चित्रपटातील त्याच्या सहकलाकाराने अल्लू अर्जुनच्या समर्थनार्थ भूमिका घेतली आहे.

कावेरी बरुआ यांनी ‘स्वीक्री टॉक्स’ पॉडकास्टमध्ये सांगितले की, अल्लू अर्जुनला भेटण्यापूर्वी त्यांना ४२ नियमांची एक यादी देण्यात आली होती. ज्यात 'डोळ्यांत पाहू नका' आणि 'हात मिळवू नका' असे नमूद होते.हा वाद वाढल्यानंतर 'पुष्पा' चित्रपटातील अल्लू अर्जुनचा सहकलाकार राजशेखर याने एक व्हिडीओ शेअर करून आरोपांवर भाष्य केलं आहे. 

राजशेखर म्हणाला, "मी चार वर्षे त्याच्यासोबत काम केले आहे. अनेक मोठे स्टार्स आपल्या स्पॉट बॉयला नाश्ता आणायला लावतात, पण अल्लू अर्जुन स्वतः येतो आणि प्रॉडक्शन बॉईजसोबत बसून जेवतो. जो माणूस सेटवर सर्वांना अभिवादन करतो आणि उशीर झाला तर माफी मागतो, त्याच्याबद्दल असे निराधार आरोप करणे चुकीचे आहे".

अल्लू अर्जुनच्या टीमकडून कायदेशीर कारवाईहे आरोप गंभीररीत्या घेत अल्लू अर्जुनच्या टीमने अधिकृत निवेदन जारी केले आहे. त्यात म्हटले आहे की, "हे सर्व दावे पूर्णपणे खोटे आणि बदनामीकारक आहेत. अल्लू अर्जुनकडून नेहमीच सहकाऱ्यांचा सन्मान केला गेला आहे. आमची कायदेशीर टीम आता जबाबदार व्यक्तींविरुद्ध मानहानीचा खटला दाखल करत आहे. अफवा आणि खोटी माहिती पसरवू नका", असे आवाहनही या निवेदनात करण्यात आले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Allu Arjun Controversy: Co-star defends behavior on set, calls him 'gentleman'.

Web Summary : Allu Arjun faces controversy after alleged claims about demanding behavior. A co-star from 'Pushpa' defended him, stating Arjun treats everyone with respect and eats with the production team, dismissing the allegations as baseless.
टॅग्स :अल्लू अर्जुन