रजनीकांत यांचा 'पडायप्पा' हा ब्लॉकबस्टर सिनेमा २५ वर्षांनंतर १२ डिसेंबर रोजी सिनेमागृहांमध्ये पुन्हा प्रदर्शित होत आहे. २५ वर्षांपूर्वी या चित्रपटाने बंपर कमाई केली होती, विक्रम प्रस्थापित केले होते आणि पुरस्कारही जिंकले होते. त्यावेळी हा चित्रपट देशभरातील ८६ सिनेमागृहांमध्ये १०० दिवसांपर्यंत चालला होता. याच चित्रपटाला नंतर तेलुगू भाषेत 'नरसिम्हा' या नावाने बनवण्यात आले आणि तो देखील हिट ठरला होता. या चित्रपटासाठी रजनीकांत यांची पहिली पसंती ऐश्वर्यालाच होती. मात्र, नंतर राम्या कृष्णनला साईन करण्यात आले.
नुकतेच रजनीकांत यांनी या चित्रपटाच्या सीक्वलची म्हणजे 'पडायप्पा २'ची देखील घोषणा केली, ज्याचे नाव 'निलांबरी-पडायप्पा २' असेल. आता 'पडायप्पा'च्या री-रिलीजच्या आधी रजनीकांत यांनी एक व्हिडीओ शेअर केला, ज्यात या चित्रपटाच्या कास्टिंगशी संबंधित एक मनोरंजक किस्सा सांगितला. रजनीकांत यांनी खुलासा केला की या चित्रपटासाठी राम्या कृष्णन ही त्यांची पहिली पसंती नव्हती. उलट, त्यांच्याऐवजी ऐश्वर्या रायला घेण्यास ते उत्सुक होते.
ऐश्वर्याच्या जागी लागली या अभिनेत्रीची वर्णीरजनीकांत यांनी सांगितले, "आमची इच्छा होती की ऐश्वर्या राय हे पात्र साकारावे. खूप अडचणींनंतर आम्ही तिच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. जर ऐश्वर्याने हे पात्र स्वीकारले असते, तर मी २-३ वर्षांपर्यंत वाट पाहण्यासही तयार होतो, कारण ते पात्र तसे महत्त्वाचे होते. त्या पात्राचे यशस्वी होणे खूप गरजेचे होते." रजनीकांत यांनी पुढे सांगितले, "आम्ही ऐकले की ऐश्वर्याला यात रस नाही." तिने नकार दिल्यानंतर निर्मात्यांनी श्रीदेवीपासून ते माधुरी दीक्षितपर्यंत अनेक नामवंत अभिनेत्रींना निलांबरीच्या भूमिकेसाठी संपर्क साधला. मात्र, रजनीकांत यांनी सांगितले की, टीम एका अशा कलाकाराच्या शोधात होती, जिच्या डोळ्यांमध्ये तो दमदार अभिनय आणि भूमिका साकारण्यासाठी आवश्यक असलेला अॅटिट्युड असेल. तेव्हा दिग्दर्शक के.एस. रविकुमार यांनी राम्याचे नाव सुचवले.
'पडायप्पा'ने केली होती विक्रमी कमाईरजनीकांत यांनी हे देखील सांगितले की 'निलांबरी: 'पडायप्पा' २' या नावाने एका सीक्वलवर काम सुरू आहे. त्यांची टीम नवीन चित्रपटाच्या कथेवर चर्चा करत आहे आणि स्क्रिप्ट निश्चित झाल्यावर ते तो बनवण्यास सुरुवात करतील. 'पडायप्पा'बद्दल बोलायचे झाल्यास, हा २१० प्रिंट्स आणि ७००,००० ऑडिओ कॅसेट्ससह जगभरात प्रदर्शित होणारा पहिला तमीळ चित्रपट होता. त्यावेळी तमीळ सिनेमातील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट देखील हा बनला होता. या चित्रपटाने तेव्हा पाच तमिळनाडू राज्य चित्रपट पुरस्कार जिंकले होते. इतकेच नाही, तर जागतिक स्तरावर ५० कोटी रुपयांचा टप्पा पार करणारा रजनीकांत यांचा हा पहिला चित्रपट मानला जातो.
Web Summary : Rajinikanth's 'Padayappa,' re-releases after 25 years. Aishwarya Rai was the initial choice, but Ramya Krishnan was cast. A sequel is planned. The film broke records and won awards. It was the first Tamil film to gross ₹50 crore globally.
Web Summary : रजनीकांत की 'पडयप्पा' 25 साल बाद फिर से रिलीज हो रही है। ऐश्वर्या राय पहली पसंद थीं, लेकिन राम्या कृष्णन को लिया गया। फिल्म ने रिकॉर्ड तोड़े और पुरस्कार जीते। इसका सीक्वल बनने वाला है। यह 50 करोड़ कमाने वाली पहली तमिल फिल्म थी।