काल देशाच्या राजकारणातील ऐतिहासिक क्षण म्हणावा लागेल असा दिवस होता. कारण सुपरस्टार थलपती विजयने तामिळनाडूचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. या सोहळ्याला अभिनेत्री तृषा क्रिष्णन उपस्थित होती. थलपती विजय मुख्यमंत्री म्हणून शपथ घेत असताना तृषा भावुक झालेली दिसली. अशातच तृषाने काल चाहत्यांना गुड न्यूज दिली. तृषाचा बहुचर्चित सिनेमा 'करुप्पु'चा ट्रेलर काल रिलीज झाला. या ट्रेलरमध्ये तृषा आणि सूर्या या दोघांची जोडी सर्वांचं लक्ष वेधून घेतेय.
या चित्रपटाचे दिग्दर्शन आरजे बालाजी यांनी केले आहे. मात्र, ट्रेलरमधील सर्वात मोठे सरप्राईज म्हणजे आरजे बालाजी स्वतः या चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहेत. सूर्यासारख्या दमदार अभिनेत्यासमोर आरजे बालाजी यांनी रंगवलेला खलनायक पाहणे प्रेक्षकांसाठी रंजक ठरणार आहे. या चित्रपटात तृषा कृष्णन मुख्य भूमिकेत आहे. ती 'प्रीती' नावाच्या एका खंबीर वकीलाची भूमिका साकारत असून सूर्या आणि तृषा यांच्यातील केमिस्ट्री पाहणं रंजक ठरणार आहे. 'करुप्पु' हा एक अॅक्शन ड्रामा चित्रपट असल्याचं दिसून येतंय.
'करुप्पु'च्या ट्रेलरची सुरुवात अत्यंत थरारक होते. न्यायालयाबाहेर वकिलांचे आंदोलन, पेटलेल्या आगीच्या ज्वाळा आणि कारमध्ये झालेला स्फोट यामुळे कथेत मोठा ट्विस्ट येतो. विशेष म्हणजे, हा चित्रपट केवळ कोर्टातील वादविवादापुरता मर्यादित नसून, त्याची कथा लोककथांशी देखील जोडलेली आहे. हा वेगळा प्रयोग प्रेक्षकांची उत्सुकता वाढवणारा ठरत आहे. तृषा क्रिष्णनचा हा नवीन चित्रपट येत्या १४ मे २०२६ रोजी प्रदर्शित होत आहे. सेन्सॉर बोर्डाने या चित्रपटाला 'U/A' प्रमाणपत्र देऊन हिरवा कंदील दाखवला आहे. एकूणच थलपती विजय आता तामिळनाडूचं राजकारण गाजवणार तर तृषा नवनवीन चित्रपटांद्वारे साउथ इंडस्ट्री गाजवणार हे नक्की.
Web Summary : Vijay sworn in as Tamil Nadu CM, attended by Trisha. Trisha's 'Karuppu' trailer released, starring her and Surya. RJ Balaji plays the villain. Trisha plays a lawyer. Film releases May 14, 2026.
Web Summary : विजय ने तमिलनाडु के मुख्यमंत्री के रूप में शपथ ली, तृषा शामिल हुईं। तृषा की 'करुप्पु' का ट्रेलर रिलीज़, जिसमें वह और सूर्या हैं। आरजे बालाजी खलनायक की भूमिका में। तृषा वकील की भूमिका निभा रही हैं। फिल्म 14 मई, 2026 को रिलीज होगी।