Join us
Daily Top 2Weekly Top 5

सेल्फीसाठी उतावीळ चाहत्याने काजलशी केलं असभ्य वर्तन, व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2024 10:49 IST

सेल्फी घ्यायला आलेल्या फॅनने केलं काजलशी असभ्य वर्तन. व्हिडीओ व्हायरल

अनेकदा फॅन्स त्यांच्या आवडत्या कलाकारांसोबत एक फोटोग्राफ घेण्यासाठी जीवाचं रान करत असतात. पण कधी भावनेच्या भरात हे फॅन्स विचित्र गोष्टी करतात. त्यामुळे कलाकारांना अनेकदा मनस्ताप सहन करावा लागतो. असाच एक संंतापनजनक अनुभव काजल अग्रवालला सहन करावा लागला. बुधवारी काजल एका कार्यक्रमासाठी गेली असता एका फॅनने तिच्याशी असभ्य वर्तन केलं.

  काजल अग्रवाल हैदराबादमध्ये एका स्टोअर लॉन्चमध्ये सहभागी झाली तेव्हा तिच्यासोबत ही घटना घडली. त्यावेळी एका चाहत्याने काजलला अयोग्यरित्या स्पर्श केला. कपड्यांच्या लाइनच्या स्टोअर लॉन्च दरम्यान, अभिनेत्रीने चाहत्यांच्या फोटोंची विनंती मान्य केली. तथापि.. फोटो क्लिक करताना, चाहत्याने अयोग्यरित्या तिच्या पाठीला स्पर्श केला.

चाहत्याने अचानक असा स्पर्श केल्याने काजलला धक्काच बसला. तिने फॅनला तिच्यापासून दूर जाण्यास सांगितले. या कार्यक्रमाचा व्हिडिओ आता व्हायरल झाला असून, नेटिझन्सकडून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. ऑक्टोबर 2020 मध्ये काजलने मुंबईतील व्यापारी गौतम किचलूसोबत लग्न केलं. आणि 19 एप्रिल 2022 रोजी त्यांनी बाळ नीलचे स्वागत झाले. दरम्यान काजल अलीकडेच  तमिळ हॉरर चित्रपट 'करुंगापियम' मध्ये दिसली.

टॅग्स :काजल अग्रवाल