Join us
Daily Top 2Weekly Top 5

शोभितानंतर साउथ क्वीन किर्ती सुरेश लवकरच करणार लग्न; सोशल मीडियावर पत्रिका व्हायरल; तुम्ही पाहिलीत?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2024 11:20 IST

नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला यांच्या लग्नानंतर साऊथ इंडस्ट्रीत अभिनेत्री किर्ती सुरेशच्या लग्नाची चर्चा होऊ लागली आहे.

Keerthy Suresh Wedding Card: नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला यांच्या लग्नानंतर साऊथ इंडस्ट्रीत अभिनेत्री किर्ती सुरेशच्या (Keerthy Suresh) लग्नाची चर्चा होऊ लागली आहे. अभिनेत्रीने अलिकडेच तिच्या रिलेशनशिपवर भाष्य केलं आणि ती कोणासोबत लग्नगाठ बांधणार? याबद्दल  मोठी अपडेट दिली होती. दाक्षिणात्य अभिनेत्री किर्ती सुरेश याच वर्षी म्हणजे डिसेंबर महिन्यात लग्न करणार असल्याचं तिने सांगितलं. अभिनेत्री तिचा बॉयफ्रेंड अँटनी थाटीलसोबत लवकरच लग्नगाठ बांधणार आहे. परंतु तिने वेडिंग डेट रिव्हिल केली नव्हती. अशातच सोशल मीडियावर अभिनेत्रीची लग्न पत्रिका समोर आली आहे.

किर्ती सुरेश आणि अँटनी थाटील यांच्या लग्नाची पत्रिका सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या लग्न पत्रिकेनुसार येत्या १२ डिसेंबरला अभिनेत्री लग्न करणार असल्याचं कळतंय. व्हाइट बॅकग्राउंड त्यावर सुंदर नक्षीकाम अशा पद्धतीने अभिनेत्रीची लग्नपत्रिका डिझाईन केली आहे. शिवाय त्यावर लिहलेल्या सुंदर ओळी नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहेत. त्याचबरोबर अभिनेत्रीच्या वडील सुरेश कुमार आणि आई मेनकासुरेश यांचं नावही पत्रिकेवर दिसतंय.

किर्ती सुरेशच्या व्हायरल होणाऱ्या लग्नपत्रिकेवर लिहलंय की, "तुम्हाला याबद्दल सांगताना आम्हाला प्रचंड आनंद होत आहे की आमची कन्या किर्ती सुरेश आणि अँटनी थाटील यांचा येत्या १२ डिसेंबरला लग्नसोहळा आयोजित करण्यात आला आहे. त्यामुळे या भावी वधू-वराला शुभाशिर्वाद देण्यासाठी आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे. लग्न पत्रिकेत पुढे लिहलंय, त्यांनी एकत्र त्यांच्या आयुष्याचा नवा अध्याय सुरू केल्याने तुम्ही त्यांना आशीर्वाद देण्यासाठी लग्नाला नक्की या! त्याबद्दल आम्ही तुमचे कृतज्ञ राहू. निमंत्रक- सुरेश कुमार आणि मेनका सुरेश."

अभिनेत्री कीर्ती सुरेश गेल्या अनेक वर्षांपासून अँटनी थाटीलला डेट करत होती. अगदी काही दिवसांपूर्वी तिने सोशल मीडियावर अँटनी थाटीलबरोबर एक फोटो पोस्ट केला होता. या पोस्टच्या माध्यमातून किर्तीने त्यांच्या नात्याची कबुली दिली.

टॅग्स :सेलिब्रेटी वेडिंगसोशल मीडियासोशल व्हायरल