Join us
Daily Top 2Weekly Top 5

सोन्या म्हणते, 'नजर'मधील भूमिका साकारणे आव्हानात्मक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2018 15:10 IST

‘स्टार प्लस’वरील ‘नजर’ मालिकेतील अभिनेत्री सोन्या हिने रूबी या व्यक्तिरेखेच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनात आपली वेगळी जागा निर्माण केली आहे.

‘स्टार प्लस’वरील ‘नजर’ मालिकेतील अभिनेत्री सोन्या हिने रूबी या व्यक्तिरेखेच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनात आपली वेगळी जागा निर्माण केली आहे. इतकेच नव्हे, तर तिने स्वत: काही स्टंटप्रसंग साकारून प्रेक्षकांची वाहवाहदेखील मिळवली आहे.

नजर’ मालिकेत एका तरूण डायनची भूमिका रंगविणारी सोन्या सर्व स्टंट प्रसंग स्वत:च साकार करते आणि ते साकारण्यापूर्वी सेटवर त्याचा सरावही करते. झाडावर चढणे, एका झाडावरून दुसऱ्या झाडावर उडी मारणे, भिंत चढणे, झाडावर उलटे लटकून राहणे, चालत्या बसवर चढणे आणि तिच्यावरून उडी मारणे यासारखे धाडसी आणि धोकादायक स्टंट प्रसंग सोन्याने स्वत:च साकार केले आहेत. सोन्या सांगते, “रूबीची भूमिका मला मिळण्यापूर्वी मला अनेक परीक्षा द्याव्या लागल्या होत्या. एका टीव्ही मालिकेतील माझी ही पहिलीच भूमिका असून ‘नजर’मधील सर्वात आव्हानात्मक भूमिका मी साकारत आहे. रूबी ही एक डायन असून तिच्याकडे काही अमानवी शक्ती आहेत, ज्यांचा वापर करून ती काहीही करू शकते. टीव्ही मालिकांमध्ये पुरुष अभिनेत्यांनी आजवर साकारले नसतील, इतके स्टंट प्रसंग मी नजर या एका मालिकेत रंगविले आहेत. त्यामुळे मला मी नजरचा नायक असल्यासारखं वाटतं. एक अभिनेत्री म्हणून मला अपवाद निर्माण करायचा होता आणि म्हणून मी हे धाडसी स्टंट प्रसंग स्वत:च साकारले. त्यांच्या धोकादायक स्वरूपामुळे त्या प्रसंगांचा बराच सराव करावा लागतो आणि त्यासाठी पुष्कळ मेहनत घ्यावी लागते. कधी कधी ते साकारताना मला दुखापतीही झाल्या आणि काही वेळा भीतीने माझं हृदय जणू बंदच पडलं. पण तरीही मला आणखी स्टंट साकारायची इच्छा होत होती आणि ते अधिकाधिक परिपूर्ण करण्याचाही मी प्रयत्न केला.” मूळची न्यूझिलंडची असलेल्या या अभिनेत्रीने प्रथम मॉडेलिंगचा व्यवसाय केला आणि आता ती अभिनयाच्या क्षेत्रात पदार्पण करीत आहे. ‘नजर’ मालिकेमधील रूबी या तरूण आणि शैलीदार डायनच्या भूमिकेने तिने प्रेक्षकांचे लक्ष स्वत:कडे वेधून घेतले आहे.

टॅग्स :नजर