Join us  

सोनू सूदचे मियामी बीचवर वर्कआउट; वय 49, पण बॉडी अशी की चाहते फिदा!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 05, 2023 1:58 PM

अभिनेता सोनू सूदची गणना बॉलिवूडच्या सर्वात फिट अभिनेत्यांमध्ये होते.

बॉलिवूड सेलिब्रिटीच्या सोशल अकाऊंटवर काही दिसो ना दिसो, एक गोष्ट मात्र आवर्जुन दिसते, ती म्हणजे, जिममध्ये वर्कआऊट करतानाचे फोटो अन् व्हिडिओ.  अभिनेता सोनू सूदची गणना बॉलिवूडच्या सर्वात फिट अभिनेत्यांमध्ये होते. सोनू सूदचे वय आहे, 49 वर्षे. पण त्याचे सिक्स पॅक अ‍ॅब्स आणि पिळदार शरीर बघून तुम्हीही अचंबित व्हाल. अलीकडेच अभिनेत्याचा एक वर्कआउट व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे,  ज्यामध्ये तो बीचवर वर्कआउट करताना दिसत आहे.

सोनूने अलीकडेच त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर त्याचा एक वर्कआउट व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओ शेअर करताना अभिनेत्याने कॅप्शनमध्ये 'मियामी' असेही लिहिले आहे. यासोबतच त्याने व्यायाम करणारी इमोजीही जोडली आहे. मियामी बीचच्या किनाऱ्यावर  व्यायाम करताना तो दिसत आहे.

 

बॉलिवूड अभिनेता सोनू सूद लवकरच 'फतेह' चित्रपटात दिसणार आहे. या अॅक्शन थ्रिलर चित्रपटासाठी अभिनेता खूप मेहनत घेत आहे. 'फतेह' चित्रपटाचे शूटिंग सध्या परदेशात सुरू आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अभिनंदन गुप्ता यांनी केले आहे. ज्यांनी यापूर्वी 'बाजीराव मस्तानी' आणि 'शमशेरा' सारख्या चित्रपटांमध्ये सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत जॅकलिन फर्नांडिस मुख्य भूमिकेत दिसणार आहे. मात्र, या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अद्याप समोर आलेली नाही.

टॅग्स :सोनू सूदबॉलिवूडसिनेमाफिटनेस टिप्स