Join us

 सोनू निगमसह पत्नी, मुलालाही कोरोनाची लागण; म्हणाला, मी कोरोना पॉझिटीव्ह आहे पण...;

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2022 10:56 IST

Sonu Nigam Corona Positive : सोनू निगम सध्या त्याच्या कुटुंबासह दुबईत आहे. एका शोच्या शूटिंगसाठी त्याला भुवनेश्वरला जायचं होतं. पण...

मनोरंजन विश्वात कोरोनाचा कहर वाढत चालल्याने चिंता वाढली आहे. गेल्या महिनाभरात अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींना कोरोनाची लागण झाली. बॉलिवूड सिंगर सोनू निगम (Sonu Nigam Corona Positive) यालाही कोरोनाची लागण झाली आहे.  सोनूसोबत त्याची पत्नी, मुलगा शिवाय सोनूची मेहुणी सुद्धा कोरोना पॉझिटीव्ह आढळले आहेत. 

सोनूने मंगळवारी सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करत याबद्दलची माहिती दिली. ‘मी सध्या कोरोना पॉझिटीव्ह आहे. मला भुवनेश्वरला परफॉर्म करण्यासाठी आणि सुपर सिंगर सीझन 3 च्या शूटींगसाठी भारतात यायचं होतं. त्यामुळे मी टेस्ट केली आणि माझा माझ्या टेस्टचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला. मी पुन्हा टेस्ट केली आणि तेव्हाही माझा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला. कदाचित लोकांना कोरोनासोबतचं जगणं शिकावं लागेल. मी घसा खराब असताना अनेक कॉन्सर्ट केले आहेत. ही स्थिती त्यापेक्षा खूप चांगली आहे. मी कोरोना पॉझिटीव्ह आहे. पण मी मरणार नाहीये. माझा घसाही ठीक आहे. पण माझ्यामुळे नुकसान सोसावं लागणाºया लोकांसाठी मला वाईट वाटतंय,’असं त्याने व्हिडीओत म्हटलं आहे.

व्हिडीओच्या शेवटी  पत्नी व मुलालाही कोरोनाची लागण झाल्याचे त्याने सांगितलं आहे. मी दीड महिन्यांपासून मुलाला भेटलो नव्हतो. त्याला भेटण्यासाठी दुबईला आलो. आता मला त्याच्यासोबत आणखी जास्त वेळ घालवता येईल, असंही त्याने सांगितलं आहे.

याआधी प्रेम चोप्रा, डेलनाज इरानी, जॉन अब्राहम आणि त्याची पत्नी प्रिया, एकता कपूर, सुमोना चक्रवर्ती यांनाही कोरोनाची लागण झाली आहे.  

टॅग्स :सोनू निगमकोरोना वायरस बातम्या