Join us
Daily Top 2Weekly Top 5

Sonam Kapoor Flat: जान्हवी कपूरनंतर तिची बहीण सोनम कपूरने विकला तिचा मुंबईतला आलिशान फ्लॉट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2023 12:16 IST

जान्हवी कपूरनंतर बहीण सोनम कपूरने 2015 मध्ये विकत घेतलेले तिचं मुंबईतील बीकेसी (सेंट्रल बिझनेस डिस्ट्रिक्ट) येथील फ्लॅट कोट्यावधींना विकल्याचे बोलले जात आहे.

अनिल कपूरची लाडकी लेक सोनम कपूर(Sonam Kapoor)  सध्या मदरहूड एन्जॉय करत आहे. पती आणि मुलगा वायुसोबत उत्तराखंडमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करते आहे. दरम्यान, तिच्याबाबत एक बातमी समोर येत आहे. सोनम कपूरची रिअल इस्टेट मार्केटमध्ये खूप चर्चा होत आहे. सोनम कपूरने मुंबईतील बीकेसी (सेंट्रल बिझनेस डिस्ट्रिक्ट) येथील एक फ्लॅट कोट्यावधींना विकल्याचे बोलले जात आहे. हे घर सोनम कपूरने 2015 मध्ये विकत घेतले होते.

Squarefeatindiaकडे असलेल्या डॉक्युमेंट्सनुसार, सोनम कपूरने हा फ्लॅट 31.48 कोटींना खरेदी केला होता. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात तिनं हा फ्लॉट 32.50 कोटी रुपयांना विकला.  म्हणजे सोनम कपूरला हा फ्लॅट विकून फारसा फायदा झालेला नाही. ज्या व्यक्तीने हे घर घेतले आहे त्याला चार कार पार्किंगही मिळाले आहे. इमारतीमध्येच सर्व सुविधा उपलब्ध आहेत. रिपोर्ट्सनुसार, सोनम कपूरने हा फ्लॅट फारसा वापरला नाही. 

रिपोर्टनुसार, स्क्वेअर फीट इंडियाचे संस्थापक वरुण सिंह यांनी सांगितले आहे की, सोनम कपूरचा हा फ्लॅट मुंबईच्या बीकेसीच्या सीबीडीमध्ये म्हणजेच बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये आहे, जे मुंबईतील सर्वात लोकप्रिय ठिकाणांपैकी एक आहे. या  परिसरातील सोनमचे घर सिग्नेचर आयलंड नावाच्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर होते. सोनमचे हे घर SMF इन्फ्रास्ट्रक्चर नावाच्या प्रसिद्ध कंपनीने विकत घेतल्याचे सांगितले जात आहे. या व्यक्तीने १.९५ कोटी रुपयांची  स्टाम्प ड्युटी भरल्याचे बोलले जात आहे.

सोनम कपूरपूर्वी बहीण जान्हवी कपूरनेही तिचे एक घर विकले होते. राजकुमार रावने तिचे  विकत घेतले होते. जान्हवी कपूरने हा अपार्टमेंट राजकुमारला ४४ कोटींना दिला होता. जान्हवी कपूरने 2020 मध्ये जुहू-विलेपार्ले डेव्हलपमेंट स्कीम अंतर्गत एका इमारतीत 14वा, 15वा आणि 16वा मजला खरेदी केला होता. 

 

 

टॅग्स :सोनम कपूरजान्हवी कपूर