Join us
Daily Top 2Weekly Top 5

'हा' आहे सोनाली कुलकर्णीचा सगळ्यात आवडता अभिनेता; नाव सांगत म्हणाली…

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2023 19:35 IST

मराठी इंडस्ट्रीतल अभ्यासू आणि तितकीच प्रतिभावान अभिनेत्री म्हणून सोनाली कुलकर्णीकडे पाहिलं जातं.

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे सोनाली कुलकर्णी. मराठी इंडस्ट्रीतल अभ्यासू आणि तितकीच प्रतिभावान अभिनेत्री म्हणून सोनालीकडे पाहिलं जातं. सोनालीने बॉलिवूडसोबतच गुजराती आणि मराठी सिनेमांमध्ये काम केले आहे.  अनेकांच्या मनावर राज्य करणारी ही अभिनेत्री बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्यापासून प्रेरित होते. 

अलिकडेच सोनालीने मिर्ची मराठीच्या 'गप्पांची मिसळ' या सेगमेंटमध्ये हजेरी लावली. यावेळी सोनालीला प्रश्न विचारण्यात आला,  काही कलाकार असतात. जे तुमचं मनोरंजन नाही करत तर तुम्हाला आव्हानही देतात. त्यांच काम पाहून तुम्ही प्रभावित होता, असा कोणता कलाकार आहे? यावर तिने एका लोकप्रिय अभिनेत्याचं नाव घेतलं.

सोनाली म्हणाली, 'मला आमिर खान प्रचंड आवडतो. त्यांच्यासोबत मी 'दिल चाहता है' मध्ये थोडसं काम केलं. मला आमिरचा प्रवास आवडतो. एक माणूस आणि अभिनेता म्हणून जो प्रयोग करतो. ते मला फार धाडसाचं वाटतं. त्याने कधीच मुलांना मीडियापासून लपून ठेवलं नाही. सिनेमे, यश-अपयश, पाणी फाउंडेशन, सत्यमेव जयते सारखा कार्यक्रम. मला त्याचं फार कौतुक वाटतं'.

'कुठल्या सुपरस्टारला एवढा वेळ आहे. समाजासाठी  देणग्या देऊ आणि मोकळं होऊ, असा दृष्टिकोन असतो. पण, आमिर नेहमी त्याच्यापलीकडे जातो. कर्मभुमी असलेल्या महाराष्ट्रासाठी त्याने काम केले आहे. त्यांचं छोट मन काय-काय विचार करतो. दंगलमधला त्याचा अभिनय. त्यात खरचं त्या मुलींचा बाप वाटतो. शिवाय '3 इडियट्स' मधील 'रँचोचं काम बघून मला रडू येतं. तसेच मला अमिताभ बच्चनही मला फार आवडतात'.   

 

टॅग्स :सोनाली कुलकर्णीमराठी अभिनेताआमिर खान