Join us
Daily Top 2Weekly Top 5

सोनाली कुलकर्णीने जागतिक साडी दिनाच्या दिल्या शुभेच्छा, म्हणाली -'लिंबू कलरची साडी' ते 'माहरेची साडी'पर्यंत...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2020 18:32 IST

जागतिक साडी दिनाच्या निमित्ताने अभिनत्री सोनाली कुलकर्णीने सोशल मीडियावर तिचे काही फोटो शेअर केलं आहेत.

फॅशन ट्रेंड कितीही बदलले तरी स्त्रियांचं सौंदर्य खुलवण्याची ताकद जेवढी या साडीत आहे तेवढी कशातही येऊ शकणार नाही. आज जागतिक साडी दिन आहे. साडीत प्रत्येक स्त्रियांच्या सौंदर्याला चार चांद लागते. जागतिक साडी दिनाच्या निमित्ताने अभिनत्री सोनाली कुलकर्णीने सोशल मीडियावर तिचे काही साडीतले फोटो आणि व्हिडीओ शेअर केला आहे. या फोटो आणि व्हिडीओमध्ये सोनालीने निळ्या रंगाची साडी परिधान केली आहे.

आज 'जागतिक साडी दिवस'  'लिंबू कलरची साडी' ते 'माहरेची साडी'पर्यंत प्रत्येक भारतीय स्त्रीचं सौंदर्य खुलावणाऱ्या या पेहरावाचा आजचा दिवस. साडी आवडणाऱ्या व आयुष्यातल्या खास क्षणी साडीला प्राधान्य देणाऱ्या प्रत्येकीला शुभेच्छास असे कॅप्शन सोनालीने या व्हिडीओसोबत दिलं आहे. 

सोनालीच्या वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाले तर 'थ्री चिअर्स टू' या मराठी सिनेमामध्ये झळकणार आहे. या सिनेमाच्या शूटिंगसाठी सोनाली लंडनमध्ये गेली होती.  आहे.लोकेश विजय गुप्ते यांचे दिग्दर्शन असलेल्या चित्रपटात हेमंतसोबत अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि संतोष जुवेकर मुख्य भूमिकेत आहे.शेवटची ती धुरळा या सिनेमात झळकली होती. या चित्रपटात तिच्यासोबत सई ताम्हणकर, प्रसाद ओक, अमेय वाघ, अंकुश चौधरी हे कलाकार मुख्य भूमिकेत होते.

टॅग्स :सोनाली कुलकर्णी